Harmanpreet Kaur | Women's T20 World Cup 2024 Sakal
Cricket

T20 World Cup 2024 : भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात; पाकिस्तानने विश्वासाला तडा दिला, आपला संघ बाहेर गेला

Women's T20 World Cup 2024 : भारतीय महिला संघाचे ट्वेन्टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात आले, तेही पाकिस्तानच्या पराभवामुळे

Swadesh Ghanekar

Harmanpreet Kaur team eliminated from Semi final:  भारतीय महिला संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून पहिल्या सामन्यातील पराभव हरमनप्रीत कौरच्या संघाला महागात पडला. तरीही भारताने सलग दोन सामने जिंकून आशा पल्लवीत केल्या होत्या, पंरतु गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने धक्का दिला. त्यामुळे भारतीय संघाला कधी नव्हे ते पाकिस्तानवर विसंबून राहावे लागेल. त्यांनीही विश्वासाला तडा दिलाच.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड हा सामना भारतासाठी महत्त्वाचा होता. भारत आणि न्यूझीलंड हे प्रत्येकी ४ गुणांसह अ गटातून उपांत्य फेरीच्या शर्यतीत होते. ऑस्ट्रेलियाने मागील सामन्यात भारताला नमवून उपांत्य फेरी पक्की केली होती. त्यामुळे पाकिस्तानने विजय मिळवला असता तर भारत सरस नेट रनरेटच्या जोरावर उपांत्य फेरीत पोहोचला असता. पाकिस्तानने प्रतिस्पर्धी न्यूझीलंडला ११० धावांवर रोखून भारतीयांना स्वप्न दाखवले.

पाकिस्तानी संघाने या सामन्यात ८ झेल टाकले. तरीही त्यांनी न्यूझीलंडला ६ बाद ११० पर्यंतच पोहोचू दिले. सुझी बॅट्स ( २८), ब्रूक हेलिडे (२२), सोफी डिव्हाइन ( १९) आणि जॉर्जिया प्लिमर ( १७) यांनी धावसंख्येत हातभार लावला. पाकिस्तानच्या नाश्रा संधूने ३ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानने १११ धवांचे लक्ष्य ११.३ षटकांत पार केले असते तर ते उपांत्य फेरीत पोहोचले असते. पण त्यांनी ११.४ षटके खेळली. मात्र न्यूझीलंडला हरवण्यात ते अपयशी ठरले.

पाकिस्तानचा संपूर्ण संघ ५६ धावांत तंबूत परतला आणि न्यूझीलंडने ५४ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानच्या पराभवामुळे भारताचे आव्हानही संपले. २०१६ च्या ट्वेन्टी २० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ प्रथमच साखळी फेरीतून बाहेर गेला, तर न्यूझीलंडने २०१६नंतर प्रथमच उपांत्य फेरी गाठली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT