Why Phoebe Litchfield not given LBW out Sakal
Cricket

IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियन फलंदाज LBW झाली तरी अम्पायरने दिले नाबाद? काय सांगतो नियम

Why Phoebe Litchfield not given LBW out?: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत रविवारी भारताच्या LBW च्या अपीलवर ऑस्ट्रेलियन फलंदाज फोबी लिचफिल्डला मिळालेले जीवदानाची बरीच चर्चा झाली. तिला जीवदान देणारा नियम काय आहे, जाणून घ्या.

Pranali Kodre

Women's T20 World Cup 2024 India vs Australia : महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत रविवारी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला अवघ्या ९ धावांनी पराभूत केले. शारजामध्ये झालेला हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रोमांचक झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १५२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला २० षटकात ९ बाद १४२ धावाच करता आल्या.

दरम्यान, या सामन्यात फोबी लिचफिल्डला मिळालेले जीवदान चर्चेचा विषय ठरला. तर झाले असे की या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून लिचफिल्ड सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरली होती. तिने १७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दिप्ती शर्माविरुद्ध चौकार ठोकला होता.

त्यानंतर दिप्तीने दुसरा चेंडू ओव्हर द विकेटवरून टाकला. यावेळी डावखुऱ्या लिचफिल्डने स्विच हिट किंवा रिव्हर्स हिट मारण्यासाठी तिचा स्टान्स बदलला. मात्र चेंडू तिच्या बॅटला न लागता पॅडला लागला. त्यामुळे भारताने विकेटसाठी अपील केले. त्यावर मैदानावरील पंच स्यु रेडफर्न यांनी तिला बाद केले.

पण लिचफिल्डने तिची सहकारी एलिस पेरीबरोबर चर्चा केल्यानंतर रिव्ह्यु घेण्याचा निर्णय घेतला. रिप्लेमध्ये गिसले की डावखुऱ्या फलंदाजांच्या लेग स्टंपच्या बाहेर चेंडूचा टप्पा पडला. त्यामुळे थर्ड अंपायरने तिला नाबाद दिला. मात्र यावर भारतीय संघ निराश दिसला.

स्मृती मानधानाने याबाबत पंचांशी चर्चाही केली. भारतीय संघाचे म्हणणे होते की लिचफिल्डने स्टान्स बदलला, त्यामुळे तिला उजव्या हाताची फलंदाज समजायला पाहिजे. जर तिला उजव्या हाताचा फलंदाज समजले असते, तर ती पायचीत होत होती. मात्र नंतरही थर्ड अंपायरचा निर्णय बदलला नाही. त्यामुळे लिचफिल्डला जीवदान मिळाले.

विशेष म्हणजे लिचफिल्डलाही वाटले होते ती बाद झाली आहे, त्यामुळे ती मैदानातून बाहेर चालली होती. परंतु, थर्ड अंपायरने नाबाद दिल्याचे पाहाताच ती खुश होत परत खेळण्यासाठी आली. तिने ऑस्ट्रेलियासाठी ९ चेंडूत १५ धावांची महत्त्वाची खेळीही केली. तिने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने १५० धावा पार केल्या होत्या.

LBW Rule

काय आहे नियम?

दरम्यान, तिच्या या जीवदानामुळे काहींचे म्हणणे आहे की तिला उजव्या हाताची फलंदाज मानायला हवे होते, तर काहींचे म्हणणे आहे की तिने नंतर स्टान्स बदलला आहे. त्यामुळे तिला नाबाद देणे योग्य होते.

मेरिलबन क्रिकेट क्लबने (MCC) केलेल्या नियमांनुसार नियम क्रमांक ३६.३ मध्ये दिले आहे की फलंदाजाची ऑफ साईड ही चेंडू ज्यावेळी गोलंदाजाच्या हातून सुटणार असतो, त्यावेळी फलंदाजाचा स्टान्स ज्या दिशेला आहे, तीच ग्राह्य धरले जाते. त्यामुळे या नियामाच्या आधारावर लिचफिल्डला नाबाद देण्यात आले. कारण तिने नंतर तिचा तिची पोजिशन बदलली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT