Women's T20 World Cup 2024  esakal
Cricket

INDWvsNZW : भारत-न्यूझीलंड यांच्यात T20 World Cupचा सामना आज; केव्हा, कुठे Live Telecast पाहता येणार?

India Women vs New Zealand Women गुरुवारपासून सुरू झालेल्या महिलांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय रणरागिणी सज्ज झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

India Women vs New Zealand Women Live Telecast : गुरुवारपासून सुरू झालेल्या महिलांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय रणरागिणी सज्ज झाल्या आहेत. आज भारताचा सलामीचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. भारतीय महिला संघाने दोन्ही सराव सामने जिंकले आहेत आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ मागील वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपदाच्या उंबरठ्यावरून परत आलेला आहे. अमिरातीमध्ये होत असलेली ही स्पर्धा भारतीयांसाठी सुवर्णसंधी आहे; मात्र त्यांना खेळात सातत्य ठेवावे लागणार आहे. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती; परंतु तेथील अस्थिर वातावरणामुळे स्पर्धा अमिरातीत होत आहे. येथील वातावरण भारतीयांसाठी फायदेशीर असल्यामुळे खेळाडूंना खेळ उंचावण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

साखळी फेरीत आव्हान...

भारताच्या गटात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. यातील दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील २०१९ ते २०२२ यादरम्यान न्यूझीलंडविरुद्ध पाच सामने झाले, त्यातील एकच सामना भारताला जिंकता आलेला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आशिया करंडक स्पर्धेत भारताने निर्विवाद वर्चस्व राखले; परंतु अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध हार झाली होती.

मानसोपचार तज्ज्ञांमुळे फरक पडणार?

गुणवत्ता आणि क्षमतेमध्ये उत्तम असलेला भारतीय संघ महत्त्वाच्या क्षणी कमी पडत असल्यामुळे या वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी करताना मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. त्याचा किती परिणाम झाला हे आता प्रत्यक्ष खेळातून दिसून येईल. स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारताने वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांचा पराभव केला होता, त्यामुळे लय आणि आत्मविश्वास उंचावलेला आहे. उपकर्णधार स्मृती मानधना संघासाठी हुकमी खेळाडू असेल.

हरमनप्रीतचे अपयश चिंताजनक

कर्णधार हरमनप्रीत कौर हुकमी खेळाडू असली तरी तिचा फॉर्म संघासाठी चिंताजनक ठरत आहे. आशिया करंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात संघाला गरज असताना तिला धावा करता आल्या नव्हत्या. तसेच, आता सराव सामन्यातही तिच्याकडून धावा झाल्या नाहीत.

सामना कुठे व केव्हा पाहता येईल?

  • भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे.

  • INDWvsNZW हा सामना स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. त्याशिवाय Disney+ Hotstar app वरही सामना पाहायला मिळेल.

भारतीय महिला : शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (क), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (डब्ल्यू), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, दयालन हेमलता, एस सजना, यस्तिका भाटिया, आशा शोभना

न्यूझीलंड महिला : सुझी बेट्स, अमेलिया केर, सोफी डेव्हाईन (सी), ब्रूक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गॅझे (डब्ल्यू), हन्ना रो, रोझमेरी मायर, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास, ली ताहुहू, लेह कॅस्परेक, जेस केर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT