Team India Sakal
Cricket

WTC 2023-25 Points Table: टीम इंडियाने सिंहासन केलं भक्कम, पण आता आव्हान न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाचे

WTC 2023-25 Points Table After India vs Bangladesh Test Series: भारतीय संघाने बांगलादेशला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचाही भाग असल्याने पाँइंट्स टेबलमध्येही बदल झाले आहेत.

Pranali Kodre

India vs Bangladesh Test Series: भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेश संघाविरुद्ध कानपूरला झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे भारताने ही मालिका २-० अशा फरकानेही जिंकली.

दुसऱ्या कसोटीत पावसाचे मोठे सावट होते. अडीच दिवस पावसामुळे वाया गेले होते. असं असतानाही ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचा भाग असल्याने निकाल महत्त्वाचा होता.

अशात भारताने रणनीती बदलली त्यांनी पहिल्या डावात टी-२० स्टाईल फटकेबाजी केली, ज्यामुळे या सामन्याचा निकाल लागणं सोपं गेलं. अखेर हा सामना भारताने जिंकला आणि मालिकाही खिशात घातली.

ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचा भाग असल्याने मालिकेच्या निकालाचा परिणाम टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाँइंट्स टेबलवरही झाला आहे. भारताने ही मालिका जिंकल्याने पाँइंट्स टेबलमधील आपले अव्वल स्थान भक्कम केले आहे.

भारताचे आता ११ सामन्यांपैकी ८ विजय आणि २ पराभवांसह ९८ पाँइंट्स झाले आहेत, तसेच ७४.२४ सरासरी टक्केवारी आहे. भारताने ही मालिका जिंकल्याने आता भारतासाठी पुढचा मार्ग सोपा आहे. तरी अद्याप त्यांच्यासमोर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांचे आव्हान आहे.

ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातच तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून तिथे ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतही जर भारताची कामगिरी चांगली राहिली, तर भारत तिसऱ्यांदा टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळताना दिसेल.

दरम्यान सध्या भारतापाठोपाठ पाँइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने १२ सामन्यांपैकी ८ सामने जिंकलेत आणि ३ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांची सरासरी टक्केवारी ६२.५० अशी आहे.

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक टक्कर श्रीलंका देऊ शकतात. त्यांनी ९ सामन्यांपैकी ५ सामने जिंकलेत, तर ४ सामने पराभूत झाले आहेत. त्यांची सरासरी टक्केवारी ५५.५६ अशी आहे. त्यामुळे श्रीलंका सध्या पाँइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बांगलादेशला मात्र भारताविरूद्धच्या पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. बांगलादेश आता पाचवरुन सातव्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांनी ८ सामन्यांपैकी ३ विजय आणि ५ पराभव स्वीकारले आहेत. त्यामुळे त्यांची सरासरी टक्केवारी आता ३४.३८ झाली आहे.

या पाँइंट्स टेबलमध्ये ४२.१९ सरासरी टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर इंग्लंड आहे. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेची ३८.८९ सरासरी टक्केवारी आहे. सहाव्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे. न्यूझीलंडची सरासरी टक्केवारी ३७.५० अशी आहे.

पाँइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटच्या स्थानी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज आहे. आठव्या क्रमांकावर पाकिस्तान असून त्यांची १९.०५ सरासरी टक्केवारी आहे, तर नवव्या क्रमांकावर वेस्ट इंडिज आहे, ज्यांची सरासरी टक्केवारी १८.५२ आहे.

भारताचा मालिका विजय

भारताने बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना चेन्नईला खेळला होता. या सामन्यात भारताने २८० धावांनी विजय मिळवला होता. तसेच दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवल्याने आता भारतीय संघाने मालिका २-० ने जिंकून बांगलादेशला व्हाईटवॉश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mundhwa Land Scam : पार्थ पवारसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- अंजली दमानिया; मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण!

Interstate Car Racket : कार भाड्याने घ्यायचे, अन् बनावट कागदपत्रे बनवून विकायचे; आंतरराज्य टोळीचा बीडमध्ये पर्दाफाश; दोघे जेरबंद!

Pune Election Nomination : पुणे महापालिका निवडणूक; पहिल्या दिवशी अर्ज भरण्याकडे उमेदवारांची पाठ!

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

आलिया- रणबीरच्या लग्नात 'या' गोष्टीच्या विरोधात होत्या नीतू कपूर; मुळीच आवडला नव्हता सुनेचा तो निर्णय

SCROLL FOR NEXT