WPL 2024 Final esakal
Cricket

WPL 2024 Final : दिल्लीला आरसीबी देणार कडवं आव्हान, विजेत्यानां रणजीपेक्षाही मिळणार मोठी बक्षीस रक्कम

अनिरुद्ध संकपाळ

WPL 2024 Final Prize Money : वुमन्स प्रीमियर लीग 2024 च्या सेमी फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 5 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणारी आरसीबी 17 मार्चला दिल्ली कॅपिटल्ससोबत भिडणार आहे. दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये असून दिल्लीने सलग दुसऱ्या हंगामात अंतिम फेरी गाठली आहे.

गेल्या हंगामात आरसीबीची कामगिरी फार चांगली नव्हती. मात्र या हंगामात त्यांनी जोरदार कमबॅक केलं. आरसीबी पहिल्यांदाच WPL च्या फायनलमध्ये पोहचली आहे. त्यामुळे ते पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी जीवाचं रान करतील यात शंका नाही. दुसरीकडे पहिल्या हंगामात हुलकावणी दिलेल्या विजेतेपदावर कब्जा करण्यासाठी दिल्ली देखील सगळा जोर लावेल. त्यामुळे यंदाचा फायनल सामना हा दमदार होईल.

वुमन्स प्रीमियर लीगच्या विजेत्याला किती मिळणार बक्षीस रक्कम?

महिला प्रीमियर लीग 2023 चे विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले होते. त्यावेळी त्यांना विजेते म्हणून 6 कोटी रूपये बक्षीस रक्कम मिळाली होती. तर उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला 3 कोटी रूपये मिळाले होते. यंदाच्या प्रीमियर लीग विजेत्यांना किती रक्कम मिळणार याबाबत बीसीसीआयने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच विजेत्या आणि उपविजेत्या संघांना बक्षीस रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ

मेग लेनिंग (कर्णधार), तानिया भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, एलिस कॅप्सी, मारिजान कैप, शिखा पांडे, एनाबेल सदरलँड, जेस जॉनासन, मिन्नू मणी, पूनम यादव, अरूंधती रेड्डी, तितास साधू, राधा यादव, अश्वनी कुमारी, अपर्णा मोंडाल, स्नेहा दिप्ती

रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा संघ

स्मृती मानधना (कर्णधार), रिचा घोष, दिशा कसत, मेघना, इंद्रानी रॉय, शुभा सतीश, सिमरन भादुर, नदीन डे क्लर्क, सोफी डिवाईन, श्रेयांका पाटील, एलिस पेरी, एकता बिष्ट, केट क्रॉस, सोफी मोलीन्यूक्स, रेणुका ठाकूर सिंग, जियोर्जिया, श्रद्धा पोखारकर, आशा शोभना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT