WPL 2024 Mumbai Indians vs Gujarat Giants news in marathi sakal
Cricket

WPL 2024 : दिल्लीत चालू मॅचमध्ये घडली मोठी घटना! बराच वेळ थांबवावा लागला सामना; नेमकं घडलं तरी काय?

महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये आतापर्यंत अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. शनिवारी हंगामातील 16 व्या सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात जायंट्सचा सामना झाला.

Kiran Mahanavar

WPL 2024 Mumbai Indians vs Gujarat Giants : महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये आतापर्यंत अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. शनिवारी हंगामातील 16 व्या सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात जायंट्सचा सामना झाला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात अचानक एक घटना घडल्याने सामना काही मिनिटे थांबवावा लागला.

महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात असे यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. मात्र, यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नाही किंवा कोणाचेही नुकसान झाले नाही. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण...

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने 20 षटकांत सात गडी गमावून 190 धावा केल्या. कर्णधार बेथ मुनीने 66 धावांची तर हेमलताने 74 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात मुंबई संघाने शानदार धावांचा पाठलाग केला. सामन्याच्या 18व्या षटकात मुंबईला 12 चेंडूत 23 धावांची गरज असताना अचानक सामना थांबवावा लागला.

अरुण जेटली स्टेडियमच्या मैदानातमध्ये अचानक पाण्याचे फवारे चालू झाले. फक्त एक-दोन कारंजे नव्हते तर अनेक होते. यानंतर बंद करण्यास काही मिनिटे लागली. आणि त्यामुळे मैदान ओले झाले. त्या कारणामुळे बराच वेळ सामना थांबवावा लागला.

मुंबईसाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने उत्कृष्ट खेळी केली. तिने 48 चेंडूत 10 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 95 धावा केल्या. यास्तिका भाटियाने 36 चेंडूंत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 49 धावांची खेळी केली. अमेलिया कार 12 धावा करून नाबाद राहिली. गुजरातच्या डावात मुंबईकडून सायका इशाकने दोन बळी घेतले. तर, हेली मॅथ्यूज, शबनीम इस्माईल, पूजा वस्त्राकर आणि सजना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तर गुजरातकडून ॲश्ले गार्डनर, तनुजा कंवर आणि शबनम शकील यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

या विजयासह मुंबई संघ महिला प्रीमियर लीग 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. आतापर्यंत त्याने सातपैकी पाच सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. मुंबईचे 10 गुण आहेत. त्याचवेळी दिल्लीचा संघ चार विजय आणि दोन पराभवांसह सहा सामन्यांतून आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सहा पैकी तीन विजयांसह सहा गुण आहेत. त्याच वेळी यूपी वॉरियर्सचे सात सामन्यांत तीन विजयांसह सहा गुण आहेत आणि ते चौथ्या स्थानावर आहे. गुजरात जायंट्स सहा सामन्यांतून केवळ एक विजय आणि पाच पराभवांसह गुणतालिकेत तळाच्या पाचव्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताई पालखीचे दर्शन घेत स्वागत केले

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT