Yashasvi Jaiswal  
Cricket

Yashasvi Jaiswal : यशस्वीनं बॅझबॉल फेम इंग्लंडला चांगलंच पळवलं; जैस्वालच्या तिसऱ्या शतकानं भारत मजबूत स्थितीत

Yashasvi Jaiswal Century : यशस्वीचे कसोटीतील तिसरे शतक, भारताची आघाडी 300 पार

अनिरुद्ध संकपाळ

Yashasvi Jaiswal : भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दमदार शतक ठोकत भारताला मजबूत स्थितीत पोहचवलं. यशस्वी जैस्वालचं हे कसोटी क्रिकेटमधील तिसरे तर एकूण चौथे शतक ठोकले. त्याने अर्धशतकानंतर आपला गिअर बदलला होता. इंग्लंडच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत गिल सोबत नाबाद शतकी भागीदारी रचली.

भारताने आपल्या दुसऱ्या डावात फलंदाजी सुरू केली त्यावेळी इंग्लंडच्या गोलंदाजांना टिच्चून मारा करत दोन्ही सलामीवीरांना शांतच ठेवलं होतं. धावांची गती म्हणावी तशी वाढत नव्हती. त्यातच जो रूटने रोहित शर्माला 19 धावांवर बाद केलं.

दुसऱ्या डावात सावध सुरूवात करणाऱ्या यशस्वी जैस्वालने रोहित बाद झाल्यानंतर आपला गिअर बदलला. गिलने देखील आल्या आल्या आक्रमक फटकेबाजी करण्यासा सुरूवात केली.यशस्वी जैस्वालने 73 चेंडूत 35 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली अन् 122 चेंडूत शतक ठोकलं.

भारताने तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 319 धावात गुंडाळला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 तर कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून बेन डकेटने दमदार फलंदाजी करत 151 चेंडूत 153 धावा ठोकल्या होत्या. तर बेन स्टोक्सने 40 धावांचे योगदान दिले.

भारताने पहिल्या डावात 126 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली. रोहित आणि यैस्वालने 30 धावांची सलामी दिली. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलने दुसऱ्या विकेटसाठी 155 धावांची दमदार भागीदारी रचली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Kolhapur Politics : मुश्रीफांची सून बिनविरोध झाल्यानंतर मंडलिक अॅक्शनमोडवर सगळ्या उमेदवारांना केलं गायब, कागलचं राजकारण वेगळ्या वळणावर

Latest Marathi News Update LIVE : अंबरनाथ नगरपालिकेच्या माहितीफलकावर गोंधळ! झाडू चिन्हाचा पक्षनावाविना उल्लेख

Maharashtra politics: मूळ मुख्यमंत्री अमित शहा! देवेंद्र फडणवीस शॅडो CM, शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर सवाल

'सोलापुरातील ॲड. राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ'; न्यायाधीशासमोर दोन साक्षीदारांची महत्त्वाची साक्ष..

SCROLL FOR NEXT