Shubman Gill India vs Zimbabwe in 3nd T20I sakal
Cricket

Zim vs Ind : मॅच जिंकली तरी शुभमन गिल चिंतेत! वर्ल्ड कप विजेत्या संघातील 3 खेळाडू ताफ्यात सामील, आता कोण होणार बाहेर?

टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे, जिथे भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे.

Kiran Mahanavar

Zimbabwe vs India : टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे, जिथे भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील आतापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी एक भारताने आणि एक झिम्बाब्वेने जिंकला आहे.

पहिल्या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी खूपच खराब होती पण दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांकडून तुफान खेळी पाहायला मिळाली. मालिकेतील तिसरा सामना 10 जुलै रोजी होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल दिसू शकतात.

संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे हे तिसऱ्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असतील. हे तीन खेळाडू 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या संघाचा भाग होते. टी-20 चॅम्पियन बनल्यानंतर हे तिघेही खेळाडू संपूर्ण टीमसह आपल्या देशात परतले, कारण त्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विजयाच्या परेडमध्ये सहभागी व्हायचे होते.

याच कारणामुळे पहिल्या दोन सामन्यांमध्ये तिन्ही खेळाडू निवडीसाठी उपलब्ध नव्हते. या मालिकेत भाग घेण्यासाठी सॅमसन रविवारीच झिम्बाब्वेला पोहोचला होता आणि त्याने संघासोबत सरावही केला होता. त्याचवेळी दुबे आणि जैस्वाल हे तिसऱ्या टी-20 पूर्वी संघात सामील होतील. अशा परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनमधून कोणते तीन खेळाडू वगळले जातील हे पाहणे बाकी आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना सात जुलै रोजी खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 100 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. या सामन्यात टीम इंडियाकडून फलंदाजीत कहर पाहायला मिळाला. अभिषेक शर्माचा हा दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता आणि त्याच्या दुसऱ्या सामन्यात त्याने शतक झळकावले.

अभिषेकने हे शतक अवघ्या 47 चेंडूत पूर्ण केले होते. याशिवाय गायकवाड आणि रिंकू सिंग यांनीही अप्रतिम खेळी खेळली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 2 गडी गमावून 234 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ १३४ धावांवर आटोपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT