Team India X/BCCI
Cricket

IND vs ZIM 5Th T20I: 168 धावा करताना झिम्बाब्वेची उडाली तारांबळ, मुकेशच्या 4 विकेट्स; भारतानं विजयासह मालिकाही जिंकली

India vs Zimbabwe: भारतीय संघाने पाचव्या टी२० सामन्यात दणदणीत विजय मिळवत झिम्बाब्वे दौऱ्याचा शेवटही गोड केला आहे.

Pranali Kodre

India vs Zimbabwe, 5th T20I: भारतीय क्रिकेट संघाने टी२० मालिका विजयासह झिम्बाब्वे दौऱ्याचा गोड शेवट केला आहे. रविवारी (१४ जुलै) झालेल्या शेवटच्या टी२० सामन्यात भारताने 42 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली.

पाचव्या टी२० सामन्यात झिम्बाब्वेसमोर भारताने १६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ १८.३ षटकातच सर्वबाद झाला. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

झिम्बाब्वेची सुरूवातच खराब झाली होती. पहिल्याच षटकात मुकेश कुमारने वेस्ली मधेवेरेला शुन्यावर त्रिफळाचीत केले. त्यानंतर त्याने ब्रायन बेनेटलाही १० धावांवर बाद केले. त्यानंतर तादिवानाशे मारुमणी आणि डायन मायर्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर मारुमणीने २७ धावांवर आणि मायर्सने ३४ धावांवर विकेट गमावली. यानंतरही सिकंदर रझा (8), जोनाथन कॅम्पबेल (4), क्लाईव्ह मदांडे (1) यांनीही झटपट विकेट्स गमावल्या.

शेवटी फराझ अक्रमने २ चौकार आणि २ षटकारांसह आक्रमण केलं, मात्र त्याला १९ व्या षटकात मुकेशनेच २७ धावांवर बाद केले. याच षटकात रिचर्ड एनगारावालाही मुकेशने बाद करत झिम्बाब्वेचा डाव संपवला.

भारताकडून मुकेशव्यतिरिक्त शिवम दुबेने २ विकेट्स घेतल्या, तर तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पुर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६७ धावा केल्या होत्या. भारताकडून संजू सॅमसनने ४५ चेंडूत ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने १ चौकार आणि ४ षटकार मारले. तसेच शिवम दुबे (27) आणि रियान पराग (22) यांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या.

झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझराबनीने २ विकेट्स घेतल्या. तसेच सिकंदर रझा, रिचर्ड एनगारावा आणि ब्रेंडन मावुता यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT