Riyan Parag Sakal
Cricket

IND vs ZIM: पहिल्याच T20I मधून रियान परागसह तीन खेळाडूंचे टीम इंडियाकडून पदार्पण; अशी आहे 'प्लेइंग-11'

India Playing XI: भारतीय संघाचा झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला टी२० सामना शनिवारी होत आहे. या सामन्यातून भारतीय संघाकडून तीन खेळाडूंचे पदार्पण झाले आहे.

Pranali Kodre

Zimbabwe vs India, 1st T20I Playing XI: भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून या ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना शनिवारी (६ जुलै) होत आहे. हरारे येथे होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण झाले आहे. यातील अभिषेक आणि रियान यांचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण आहे, तर जुरेलचे यापूर्वीच इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले आहे, पण त्याला भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.

दरम्यान, या सामन्यासाठी टी२० वर्ल्ड कप जिंकून आलेल्या भारतीय संघातील खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे.त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे.

यापूर्वीच शुभमनने सांगितल्याप्रमाणे आता अभिषेक त्यांच्यासह सलामीला फलंदाजी करता दिसेल, तर ऋतुराज गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार आहे. दरम्यान, अनेक वरिष्ठ खेळाडूंनी टी२०मधून निवृत्ती घेतल्याने आणि काही खेळाडूंना विश्रांती दिल्याने या सामन्यात भारताचा पूर्णपणे नवा संघ उतरला आहे.

शुभमन गिलचीही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तो भारताचे आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये नेतृत्व करणारा १२ वा खेळाडू ठरला आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकु सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद

  • झिम्बाब्वे - तादिवानाशे मारुमणी, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदंडे (यष्टीरक्षक), वेस्ली माधेवरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंदाई चतारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT