क्रीडा

प्रजासत्ताक दिनी PM मोदींचा गेलला मेसेज; युनिव्हर्सल बॉसने दिल्या शुभेच्छा

सकाळ डिजिटल टीम

ख्रिस गेलनं शुभेच्छा देताना त्याला मोदींचा एक खास मेसेज मिळाल्याचंही सांगितलं.

भारत ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यानिमित्त अनेक दिग्गजांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आणि युनिव्हर्सल बॉस अशी ओळख असलेल्या ख्रिस गेलनं ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

ख्रिस गेलनं शुभेच्छा देताना त्याला मोदींचा एक खास मेसेज मिळाल्याचंही सांगितलं. ख्रिस गेलनं ट्विटमध्ये म्हटलं की, मी भारतीयांना ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका मेसेजमुळे आज दिवसाची सुरुवात झाली. मोदींनी पाठवलेल्या मेसेजमध्ये त्यांच्यासह भारतीयांसोबत असलेल्या माझ्या घनिष्ठ नात्यांबद्दल लिहिलं होतं. तुम्हा सर्वांना युनिव्हर्सल बॉसकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम.

क्रिकेटचं मैदान आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाइलने गाजवणारा ख्रिस गेलचा भारतात खास चाहता वर्ग आहे. आय़पीएलमध्ये खेळताना त्यानं भारतीयांची मने जिंकली आहेत. वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूंपैकी ख्रिस गेल एक असून. टी २० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा दोन वेळा सदस्य होता. २०१२ आणि २०१६ मध्ये वेस्ट इंडिजने वर्ल्ड कप जिंकला होता. ख्रिस गेलने ४८३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्यानं १९ हजार ५९३ धावा केल्या असून ४२ शतकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Punjab Mail : ११४ वर्षांची परंपरा जपत ‘पंजाब मेल’ नव्या रूपात रुळांवर

SCROLL FOR NEXT