umran malik siraj khan avesh khan eid ul adha prayers england wishing fans bakari eid
umran malik siraj khan avesh khan eid ul adha prayers england wishing fans bakari eid 
क्रीडा

इंग्लंडमध्ये उमरान, सिराज आणि आवेश खानने अदा केली ईदची नमाज

Kiran Mahanavar

Bakari Eid: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने 50 धावांनी जिंकला होता. अशा स्थितीत टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी आहे, तर यजमान इंग्लंडचा संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारतीय खेळाडू उमरान मलिक, मोहम्मद सिराज आणि आवेश खान यांनी बकरीदचा सणही साजरा केला आहे. (umran malik siraj khan avesh khan eid ul adha prayers england wishing fans bakari eid)

इंग्लंडमध्ये सध्या हे तीन खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंडमध्ये ईद-उल-अजहानिमित्त सर्वांनी मिळून ईदची नमाज अदा केली. तिघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा फोटो शेअर केला आहे. उमरान मलिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उमरानने तिन्ही खेळाडूंसोबतचा आपला फोटो शेअर केला आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.

भारताच्या उमरान मलिकला आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली. पण त्याला इंग्लंडविरुद्ध संधी मिळाली नाही. उमरान हा भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. या वर्षी टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तेच खेळाडू वापरण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत आहे जे येत्या टी-२० मध्ये भारतीय संघाचा भाग असतील. अशा परिस्थितीत आवेश खान, सिराज आणि उमरान यांच्यापैकी कोणत्या खेळाडूला टी-२० विश्वचषकात संधी देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT