Cristiano Ronaldo esakal
क्रीडा

Cristiano Ronaldo: मँचेस्टर युनायटेडमधून बाहेर पडताच रोनाल्डोची मोठी घोषणा

फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडचा दिग्गज स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने तात्काळ संघ सोडण्याचा निर्णय घेतला

सकाळ डिजिटल टीम

फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडचा दिग्गज स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने तात्काळ संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मँचेस्टर युनायटेडमधून बाहेर पडल्यानंतर रोनाल्डोने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे. (Cristiano Ronaldo big announcement after Leave Manchester United)

'क्रिस्टियानो रोनाल्डो तात्काळ प्रभावाने परस्पर कराराने मँचेस्टर युनायटेड सोडत आहे. असे मँचेस्टर युनायटेडने म्हटले आहे. दरम्यान, फुटबॉलच्या महाकुंभात रोनाल्डो आता काय करणार? भविष्यात तो कोणाकडून खेळणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

अशातच, रोनाल्डोने इंस्टा पोस्ट करत त्याच्या भविष्याबद्दल भाष्य केलं आहे. त्याने jacobandco या मोठ्या घड्याळाच्या कंपनीसोबत पार्टनरशिप केली असल्याची घोषणा केली आहे.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

जगातील आघाडीच्या घड्याळ ब्रँडपैकी एक, @jacobandco सोबत माझी भागीदारी जाहीर करताना मला आनंद होत आहे. आज, मी पहिल्यांदाच घड्याळ संग्रह शेअर करत आहे. मी माझ्या प्रिय मित्र @jacobarabo सोबत डिझाइन केले होते. असे रोनाल्डोने म्हटले आहे.

या हंगामात रोनाल्डोला क्लबच्या अनेक सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला सुरुवातीच्या इलेव्हनमध्येही स्थान मिळाले नव्हते. तो अनेक सामन्यांमध्ये बदली खेळाडू म्हणून खेळला आहे. फुलहॅमविरुद्धच्या संघात रोनाल्डोचेही नाव नव्हते. संघाने तो सामना 2-1 असा जिंकला.

प्रसिद्ध पत्रकार पियर्स मॉर्गनला दिलेल्या मुलाखतीत रोनाल्डोने अनेक गोष्टींचा खुलासा केला आणि आपला राग काढला. रोनाल्डो 12 वर्षांनंतर 2021 मध्ये क्लबमध्ये सामील झाला होता. 2009 मध्ये त्याने मँचेस्टर युनायटेड सोडले. यानंतर तो स्पेनच्या प्रसिद्ध क्लब रिअल माद्रिदमध्ये गेला. तिथून तो पुन्हा इटालियन क्लब युव्हेंटसकडून खेळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT