Cristiano Ronaldo Vs Lionel Messi esakal
क्रीडा

Cristiano Ronaldo Vs Lionel Messi : रोनाल्डोची मैदानावरच सटकली, कारण ठरला लिओनेल मेस्सी; पाहा VIDEO

अनिरुद्ध संकपाळ

Cristiano Ronaldo Vs Lionel Messi : अल - हिलालने नुकतेच अल नासरला 2 - 0 अशी मात दिली. या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोचा कोणताही प्रभाव दिसून आला नाही. अल हिलालचा गोलकिपर यासिन बोनुयूला रोनाल्डोचा चारपैकी एकच फटका आडवावा लागला. दरम्यान, सामन्यावेळी लिओनेल मेस्सीच्या नावाची घोषणाबाजी झाल्याने ख्रिस्तियानो रोनाल्डो चांगलाच भडकला होता.

ख्रिस्तियानो रोनाल्डो हा लिओनेल मेस्सीचा फार मोठा फॅन नाहीये. हे दोघे प्रतिस्पर्धी असून दोघांचेही चाहते कोण ग्रेट फुटबॉलपटू आहे यावरून एकमेकांना भिडत असतात. बॅलॉन डेओर पुरस्कार जिंकण्यातही या दोघांमध्ये प्रचंड चुसर पहावयास मिळते.

दरम्यान, रियाध सिजन कप 2024 च्या अल हिलाल आणि अल नासर यांच्यातील सामन्यावेळी प्रेक्षकांनी मेस्सी-मेस्सी अशा घोषणा दिल्या. त्यामुळे रोनाल्डो चांगलाच चिडला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोनाल्डोला अल - हिलालविरूद्धच्या सामन्यात कोणताही प्रभाव पाडता आला नाही. अल नासरचा 2 - 0 असा पराभव झाला. रोनाल्डोने हिलालविरूद्धच्या सामन्यात चारवेळा गोलपोस्टवर आक्रमण केलं. मात्र त्याला गोल करण्यात यश आलं नाही. याचवेळी अल हिलालच्या प्रेक्षकांनी रोनाल्डोची टर उडवायला सुरूवात केली. त्यांनी त्याच्या कट्टर प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीच्या नावाचा जयघोष करण्यासा सुरूवात केली. यामुळे रोनाल्डो जाम भडकला.

मेस्सीच्या नावाचा जयघोष सुरू झाल्यावर रोनाल्डो चिडला. त्याने हातवारे करत अल - हिलालच्या प्रेक्षकांना सांगितलं की आता मी इथं आहे मेस्सी नाही.'

दुसऱ्या एका व्हिडिओत रोनाल्डो अल - हिलाल आणि त्यांच्या चाहत्यांसमोर अक्षेपार्ह हावभाव करत असल्याचे दिसते. अल - हिलालचे काही स्कार्फ हे रोनाल्डो ड्रेसिंग रूममध्ये जात असताना त्यांच्या अंगावर फेकण्यात आले. याला प्रत्युत्तर देताना 39 वर्षाने आक्षेपार्ह हावभाव केले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT