Croatia Defeat Morocco Esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : मोरोक्कोचे इतिहास रचण्याचे स्वप्न भंगले; गतवेळच्या उपविजेत्याचा 'थर्ड प्लेस'वर शेवट

अनिरुद्ध संकपाळ

Croatia Defeat Morocco : क्रोएशियाने फिफा वर्ल्डकपची सेमी फायनल पहिल्यांदा गाठलेल्या मोरोक्कोचा थर्ड प्लेसच्या सामन्यात 2 - 1 असा पराभव केला. गतवेळच्या उपविजेत्या क्रोएशियाने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एक पायरी खाली येत तिसऱ्या स्थानावर समाधान मानले. आजच्या सामन्यात पहिल्या 10 मिनिटाचांच्या आतच दोन गोल करण्यात आले होते.

मोरोक्कोने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत सेमी फायनलपर्यंत धडक मारली होती. फिफा वर्ल्डकप इतिहासात सेमी फायनल गाठणारा मोरोक्को हा आफ्रिका खंडातील पहिपा देश ठरला होता. त्यांना थर्ड प्लेसचा सामना जिंकून इतिहास रचण्याची आजच्या सामन्यात संधी होती. मात्र क्रोएशियाने त्यांचे स्वप्न तोडले. फ्रान्सने मोरोक्कोचा सेमी फायनलमध्ये 2 - 1 असा पराभव केला. तर अर्जेंटिनाने क्रोएशियाचा 3 - 0 असा पराभव केला होता.

थर्ड प्लेससाठीच्या सामन्यात पहिल्या 10 मिनिटातच जोरदार आक्रमण प्रतिआक्रमण पहायला मिळाले. क्रोएशियाच्या जोस्को ग्वारदिओलने 7 व्या मिनिटाला मोरोक्कोची गोलपोस्ट भेदली. क्रोएशियाने सामन्याची 10 मिनिटे देखील पूर्ण झाली नव्हती त्यावेळी 1 - 0 अशी आघाडी घेतली. मात्र या गोलचा आनंद क्रोएशियाल अवघी दोन मिनिटे देखील साजरा करता आला नाही. मोरोक्कोच्या अचरफ दारीने 9 व्या मिनिटाला क्रोएशियाच्या गोलची परतफेड करत 1 - 1 अशी बरोबरी साधली. यानंतर दोन्ही संघांनी एकमेकांच्या गोलपोस्टवर चढाया सुरू केला. अखेर पहिला हाफ संपायला अवघी दोन मिनिट शिल्लक असताना क्रोएशियाच्या मिसाव्ह ओसरिचने 42 व्या मिनिटाला गोल करत क्रोएशियाला 2 - 1 अशी आघाडी मिळवून दिली.

दरम्यान, मोरोक्कोने दुसऱ्या हाफमध्ये क्रोएशियाशी बरोबरी करण्यासाठी चढाया करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटपर्यंत त्यांना क्रोएशियाची गोलपोस्ट भेदण्यात यश आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

CM Devendra Fadnavis: उद्योगांत महाराष्ट्र अव्वलच, 'कंपन्या बंद'चा दावा चुकीचा; फडणवीस यांचा विश्वास

आज शूटिंगचा शेवटचा दिवस... झी मराठीची मालिका अवघ्या ७ महिन्यात घेणार निरोप; मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना धक्का

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

IND vs SL 1st Test: परदेशात फडकला तिरंगा, राष्ट्रगीताने भारावलं गॉलचं मैदान; शुभमन गिलसह टीम इंडियाचा VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT