Csk s instagram handle unfollows Ravindra Jadeja  esakal
क्रीडा

जडेजाला अनफॉलो करण्याबाबत खुद्द CSK च्या सीईओंनीच केला खुलासा

चेन्नई सुपर किंग्जने (CSK) त्यांच्या सोशल मीडियावर जडेजाला(Ravindra Jadeja) अनफॉलो केल्यामुळे दोघांमध्ये मतभेदाच्या अफवा सुरु झाल्या आहेत.

धनश्री ओतारी

चेन्नई सुपर किंग्जने (CSK) त्यांच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलवर रवींद्र जडेजाला(Ravindra Jadeja) अनफॉलो केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सीएके आणि जडेजा यांच्या वादाची चर्चा तुफान रंगली आहे. दोघांमध्ये मतभेदाच्या अफवा सुरु झाल्या आहेत. अशातच, सीएसकेच्या सीईओने यासंदर्भात खुलासा केला आहे.

बरगडीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2022 च्या उर्वरीत हंगामातून बाहेर गेलेल्या जाडेजाला आता संघाने इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने जाडेजा आणि सीएसकेमध्ये गंभीर वाद असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

अशातच, सीईओ काशी विश्वनाथन यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना याबाबत भाष्य केले. 'संघ व्यवस्थापन आणि जाडेजामध्ये कोणताच वाद नसून सोशल मीडियावर काय सुरु आहे, याबाबत मला अधिक माहित नाही. पण भविष्यात जाडेजा नक्कीच सीएसके संघातच असेल''. असे मोठे विधान विश्वनाथ यांनी यावेळी केलं.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (RCB) क्षेत्ररक्षण करत होता. दरम्यान अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुखापत झाली आणि त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशी घोषणा चेन्नई सुपर किंग्जने बुधवारी त्यांच्या ट्विटर हँडलवरून केली आहे.

जडेजाने इंस्टाग्रामवर फ्रेंचायझीला अनफॉलो केली आहे. जडेजा गेल्या 10 वर्षांपासून फ्रँचायझीचा महत्त्वाचा भाग आहे. आयपीएल साठी संघाचा सर्वात महागडा खेळाडू म्हणून त्याला संघात घेतले होते. मात्र त्याने फ्रँजायझीला अनफॉलो केल्यामुळे क्रिकेट जगतात चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai HC Chief Justice: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमचा मोठा निर्णय! बॉम्बे हायकोर्टला नवे मुख्य न्यायाधीश मिळणार; कुणाची नियुक्ती होणार?

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! अखेर सायन आणि विद्याविहार उड्डाणपूल खुले होणार, उद्घाटनाचा मुहूर्तही ठरला

विद्यार्थ्यांसमोर झुकलं झारखंड सरकार; JPSC परीक्षा रद्द करण्याचं आश्वासन, ९० दिवसांत CID चौकशी

August Horoscope: अखेर प्रतीक्षा संपणार! ऑगस्टमध्ये ‘या’ राशींची रखडलेली कामं मार्गी, पैशांसह मिळणार मोठी खुशखबर

Marathi News Live Updates : इस्रायलमध्ये सैनिकांच्या सर्व सुट्ट्या रद्द, इराणवर पुन्हा हल्ल्याची तयारी? मोठी अपडेट समोर...

SCROLL FOR NEXT