CWG 2022 Bhavina Patel wins gold medal in para table tennis esakal
क्रीडा

CWG 2022: पॅरा टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक; भाविना पटेलची कमाल

धनश्री ओतारी

कुस्तीत तीन सुवर्णपदकं मिळवल्यानंतर भारताची दिग्गज पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलने आणखी एक गोल्ड मेडल जिंकून दिलं आहे. तिने पॅरा टेबल टेनिसच्या महिला एकेरीत (वर्ग 3-5)हे पदक मिळवलं आहे. यासह पॅरा टेबल टेनिसमध्येच भारताच्या सोनलबेन पटेलने कांस्यपदक मिळवलं आहे. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे 13 वे सुवर्णपदक आहे.(CWG 2022 Bhavina Patel wins gold medal in para table tennis)

भाविनाने फायनलमध्ये नायजेरियाच्या टेनिसपटूला 12-10, 11-2 आणि 11-9 अशा तीन सेट्समध्ये मात देत सामना जिंकला. याआधी भाविनाने उपांत्य फेरीच्या (Semifinal) सामन्यात इंग्लंडच्या सू बेलीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवत पदक निश्चित केलं होतं.

त्याचवेळी, याशिवाय भारताच्या सोनल बेन पटेलने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकले. तिने ब्राँझपदकाचा सामना 3-5 ने जिंकला. आत्तापर्यंत भारताने 38 पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये 13 सुवर्णपदकांचा समावेश आहे.

भाविना पटेल सर्वात आधी 2011 च्या थायलंड टेबल टेनिस चॅम्पियनशिपमधून प्रकाशझोतात आली. पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत तिने त्यावेळी सुवर्णपदक पटकावले. नंतर, 2013 मध्ये0 आशियाई पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या महिला एकेरीतही रौप्य पदक जिंकले. ती इथेच थांबली नाही. यानंतर त्याने 2017 मध्ये आशियाई पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत पुन्हा एकदा कांस्यपदकाला गवसणी घातली. मागील वर्षी टोक्यो पॅरालिम्पिकमध्येही तिने कमाल कामगिरी करत थेट रौप्यपदक मिळवलं. हे तिच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात मोठे यश होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT