CWG 2022 Silver-Medalist Murali Sreeshankar Finishes Sixth at Monaco Diamond League sakal
क्रीडा

CWG 2022 Diamond League : राष्ट्रकुल रौप्य विजेता श्रीशंकर सहावा

डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या मुरली श्रीशंकरने लांब उडीत सहावे स्थान मिळवताना तीन गुणांची कमाई केली

सकाळ वृत्तसेवा

मोनॅको : डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या मुरली श्रीशंकरने लांब उडीत सहावे स्थान मिळवताना तीन गुणांची कमाई केली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या श्रीशंकरने मोनॅको येथील स्पर्धेत ही कामगिरी केली. त्याला आठ मीटरचा टप्पा पार करता आला नसला तरी १० दिग्गज खेळाडूंचा समावेश असताना त्याने सहावे स्थान मिळवून डायमंड लीगमध्ये आपले खाते उघडले.

अमेरिकेत झालेल्या जागतिक स्पर्धेत सातवे स्थान मिळविल्यानंतर केरळमधील पलक्कडच्या असलेल्या श्रीशंकरने नुकत्याच बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८.०८ मीटर अंतरावर उडी मारून रौप्यपदक जिंकले होते. जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीतही त्याने ८ मीटरवर उडी मारली होती; मात्र मोनॅकोत त्याला ८ मीटरचा जादूई आकडा गाठता आला नाही. पाचव्या प्रयत्नात ७.९४ मीटर अंतरावर उडी मारली. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याची सुरुवात आश्वासक नव्हती. ७.६१ मीटर अंतरच तो गाठू शकला होता. तो ८ मीटरपेक्षा अधिक उडी मारू शकला असता, तर त्याला चौथे स्थान मिळू शकले असते.

यात जागतिक स्पर्धेत चौथे स्थान मिळवणाऱ्या क्युबाच्या मॅसो मायकेलने ८.३५ मीटरची कामगिरी करताना प्रथम स्थान मिळवले. जागतिक रौप्यपदक विजेत्या ग्रीसच्या मिल्टीडिअस टेंटाग्लो याला ८.३१ मीटरसह दुसरे स्थान मिळाले. सध्या हा डायमंड लीगमध्ये २४ गुणांसह आघाडीवर आहे. श्रीशंकर ३ गुणांसह अन्य दोन खेळाडूंसोबत संयुक्तपणे नवव्या स्थानावर आहे. ८.३६ मीटर ही श्रीशंकरची सर्वोत्तम कामगिरी आहे. पुढील डायमंड लीग स्पर्धा २६ ऑगस्ट रोजी लुसान (स्वित्झर्लंड) येथे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोटात जोराची कळ, हायवेवर शौचालय दिसेना, गाडी पळवल्यानं मलाच ४ वेळा दंड झाला; न्यायमूर्तींनी NHAIला फटकारलं

BJP MLA: पाणी प्रश्नावर आवाज उठवला तर BJP आमदाराने थेट पायच तोडले... नेमकं काय घडलं? अजून एकालाही अटक नाही

Latest Marathi News Updates : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Pune News : सदनिकाधारक, भाडेकरूंना मोठा दिलासा; भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिकांवर अतिरिक्त सेवा शुल्क आकारता येणार नाही

SCROLL FOR NEXT