D Gukesh becomes youngest man to win World Championship News Marathi sakal
क्रीडा

D Gukesh : वयाच्या 17 व्या वर्षी पठ्ठ्याने रचला इतिहास! Candidates Chess Tournament जिंकणारा गुकेश ठरला सर्वात तरुण खेळाडू

Kiran Mahanavar

D Gukesh News : भारताचा १७ वर्षीय डी. गुकेशने सोमवारी कॅनडातील टोरंटो येथे खेळल्या जाणाऱ्या कँडिडेट्स चेस टूर्नामेंट 2024 मध्ये इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. विश्वनाथन आनंद नंतर स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. आता विश्वविजेता बनण्यासाठी गुकेशचा सामना चीनच्या डिंग लिरेनशी होणार आहे.

गुकेशने 14व्या आणि अंतिम फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत सहज ड्रॉ खेळला आणि 14 पैकी नऊ गुणांसह स्पर्धा पूर्ण केली. या विजयामुळे गुकेशला या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या सामन्यात सध्याचा विश्वविजेता चीनच्या डिंग लिरेनचे आव्हान असणार आहे. चेन्नईच्या या युवा बुद्धिबळपटूने कास्पारोव्हच्या विक्रमात बरीच सुधारणा केली.

विजयानंतर गुकेश म्हणाला की, 'खूप आनंद झाला. मी फॅबियो कारुआना आणि इयान नेपोम्नियाच्ची यांच्या खेळाचे देखील अनुसरण करत होतो. त्यानंतर मी ग्रेगॉर्ज गजेव्स्की या दुसऱ्या खेळाडूशी बोललो, मला वाटते की त्याचा फायदा झाला.

टूर्नामेंट जिंकण्याबरोबरच गुकेशने 88,500 युरो (अंदाजे 78.5 लाख रुपये) चे रोख बक्षीसही जिंकले. उमेदवारांसाठी एकूण बक्षीस रक्कम 5,00,000 युरो होती. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकणारा ग्रेट विश्वनाथन आनंदनंतर गुकेश दुसरा भारतीय ठरला. पाच वेळा विश्वविजेता आनंदचा विजय 2014 मध्ये आला होता.

आनंदने 'X' वर पोस्ट केले, 'सर्वात तरुण चॅलेंजर बनल्याबद्दल डी गुकेशचे अभिनंदन. वाका चेस कुटुंबाला तुम्ही जे काही साध्य केले त्याचा अभिमान वाटतो. तुम्ही ज्या प्रकारे खेळलात आणि कठीण प्रसंग हाताळलेत त्याबद्दल मला वैयक्तिकरित्या खूप अभिमान वाटतो. या क्षणाचा आनंद घ्या.' विश्वनाथन हे देखील चेन्नईचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT