Eng vs NZ esakal
क्रीडा

VIDEO एँडरसनचा चेंडू पडला महागात, न्यूझीलंडच्या फलंदाजाचा तुटला दात

एँडरसनने फेकलेल्या घातक चेंडूवर न्यूझीलंडचा फलंदाज गंभीर जखमी

धनश्री ओतारी

क्रिकेट मैदानात अनेकवेळा अपघात घडत असतात. अनेकदा गोलंदाजाच्या चेंडूमुळे फलंदाज जखमी झाल्याचे पाहिलं आहे. याचा प्रत्यय इंग्लंड (England) विरुद्ध न्यूझीलंड (New Zeland) सामन्यात आला. ही घटना २००८ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर घडली आहे.

या सामन्यात, न्यूझीलंड संघाची धावसंख्या त्यावेळी १३० धावांवर ४ बाद अशी होती. त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या फ्लिनला अँडरसनने एक खतरनाक बाऊंसर फेकला. चेंडू मारण्यात फ्लिनला अपयश आले. चेंडू थेट फ्लिनच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. चेंडूचा फटका इतका जोरदार होता की हेल्मेट थेट फ्लिनच्या तोंडावर आदळले आणि तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला. रक्तस्त्राव पाहून वैद्यानी मैदानात धाव घेतली.

तपासणी केली असता त्याचा दात तुटला असल्याचे समजले. त्यानंतर त्याला उपचारासाठी मैदानाबाहेर नेण्यात आलं. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या दुखापतीनंतर डॅनियल फ्लिनची कारकीर्द संपेल असे मानले जात होते, परंतु, न्यूझीलंडचा फलंदाज डॅनियल फ्लिनने हार मानली नाही आणि इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 49 धावा करत क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT