Danish Kaneria on Shahid Afridi
Danish Kaneria on Shahid Afridi sakal
क्रीडा

पाकिस्तानचा निवड समिती अध्यक्ष दाताने बॉल चावणारा; माजी क्रिकेटपटूनं काढला चिमटा

Kiran Mahanavar

Danish Kaneria on Shahid Afridi : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला नुकतीच नवी जबाबदारी मिळाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ राजा यांची हकालपट्टी केल्यानंतर नजम सेठी यांनी बोर्डाची जबाबदारी स्वीकारली. नजम सेठी येताच त्यांनी संघाच्या हंगामी मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी आफ्रिदीकडे सोपवली.

शाहिद आफ्रिदीला नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर काही माजी सहकारी आफ्रिदीचे अभिनंदन करत असतानाच त्याचा माजी संघसहकारी फिरकीपटू दानिश कनेरियाने त्याचा चिमटा काढला. दानिशने त्याच्या ट्विटर हँडलवर आफ्रिदीचा अनेक वर्षे जुना बॉल टॅम्परिंगचा फोटो शेअर केला आहे.

हा फोटो पोस्ट करताना दानिश कनेरियाने हसणाऱ्या इमोजीसह 'चीफ सिलेक्टर' असे लिहिले आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेदरम्यान पर्थ येथे ही कुप्रसिद्ध घटना घडली. आफ्रिदीने बॉल कट करून पोझिशन बदलण्याचा प्रयत्न केला. ही घटना थेट टीव्हीवर दाखवण्यात आली आणि आफ्रिदीवर 2 टी-20 सामन्यांची बंदीही घालण्यात आली.

शाहिद आफ्रिदीला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी पाकिस्तान संघाचा हंगामी मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाक आणि राव इफ्तिखार अंजुम या पॅनलमध्ये आहेत. ही निवड समिती केवळ न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मायदेशातील मालिकेसाठी नियुक्त करण्यात आली आहे. मोहम्मद वसीम यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निवडलेल्या कसोटी संघाचे पुनरावलोकन करण्याची जबाबदारी ही समिती असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT