David Miller Daughter Passes Away :  sakal
क्रीडा

डेव्हिड मिलरवर दुःखाचा डोंगर, कॅन्सरने चिमुकलीचे निधन, सामन्यापूर्वी शेअर केला भावूक Video

डेव्हिड मिलरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर करून अॅनीला श्रद्धांजली वाहिली

Kiran Mahanavar

David Miller : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा फलंदाज डेव्हिड मिलरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डेव्हिड मिलर यांच्या जवळच्या व्यक्तीचा कर्करोगाने निधन झाले आहे. डेव्हिड मिलरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर करून अॅनीला श्रद्धांजली वाहिली आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये डेव्हिड मिलर एका मुलीसोबत दिसत आहे. रिपोर्टनुसार ती मुलगी कॅन्सरशी झुंज देत होती. उपचारादरम्यान ती तिच्या सोबत जास्त वेळ घालवताना दिसली. पण मिलर यांनी मुलीच्या आजाराबाबत कोणतेही वक्तव्य किंवा संदेश दिलेला नाही.

डेव्हिड मिलरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, RIP माझा छोटा रॉकस्टार. मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या फोटोंमध्ये मिलरसोबत दक्षिण आफ्रिकेच्या संघाची जर्सी घातलेला दिसत आहे. तसेच काही फोटोंमध्ये तो मुलीला बॉलमध्ये घेऊन जाताना दिसत आहे. तिच्यासोबत खेळतानाही दिसत आहे. काही मीडिया रिपोर्ट नुसार असा दावा केला जात आहे की, ती मुलगी त्याची आहे. पण जवळच्या मित्राची मुलगी असल्याची पुष्टी झाली आहे.

डेव्हिड मिलर सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. भारताविरुद्धच्या सध्याच्या दौऱ्यावर त्याने बॅटने धमाल केली आहे. गुवाहाटी येथे झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात मिलरने शानदार शतक झळकावले. त्यानंतर लखनौ येथे खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात मिलरने नाबाद 75 धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT