क्रीडा

IND vs SA : आफ्रिका पोहचवली टॉपवर; भारताच्या पराभवाने पाकची झाली अडचण

अनिरुद्ध संकपाळ

South Africa Defeat India : टी 20 वर्ल्डकप ग्रुप 2 मधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचे 5 विकेट्सनी पराभव करत गुणतालिकेत पाच गुणांसह अव्वल स्थान पटकावले. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या सेमी फायनल गाठण्याच्या भाबड्या आशेवर पाणी फिरले. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 134 धावांचे आव्हान ठेवले होते. खराब सुरूवातीनंतर एडिन माक्ररम (51) आणि डेव्हिड मिलर (46 चेंडूत नाबाद 59 धावा) यांनी डाव सावरत झुंजार अर्धशतकी खेळी करत भारताचे आव्हान षटकात पार केले. भारताकडून अर्शदीप सिंगने 2 तर हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. भारताकडून सूर्यकुमार यादवने 40 चेंडूत झुंजार 68 धावा केल्या. या खेळीच्या जोरावरच भारत 133 धावांपर्यंत पोहचू शकला.

भारताचे 134 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला भारताच्या अर्शदीप सिंगने एकाच षटकात दोन मोठे धक्के दिले. सामन्याच्या दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिल्या षटकात त्याने क्विंटन डिकॉकला 1 तर गेल्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या रिली रॉसोला शुन्यावर बाद केले. यामुळे आफ्रिकेची अवस्था 2 बाद 3 धावा अशी झाली. त्यानंतर पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात मोहम्मद शमीने कर्णधार टेम्बा बाऊमाला 10 धावांवर बाद करत अजून एक धक्का दिला. आफ्रिकेची पॉवर प्लेमध्ये 3 बाद 24 धावा अशी झाली.

भारताने सुरूवातीलाच 3 धक्के दिल्यानंतर एडिन माक्ररम आणि डेव्हिड मिलर यांनी सावध फलंदाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 10 व्या षटकापर्यंत संथ फलंदाजी करत फक्त 40 धावा केल्या. मात्र त्यानंतर त्यांनी हार्दिक पांड्या आणि आर. अश्विनवर हल्ला चढवण्यास सुरूवात केली. माक्ररमने 39 चेंडूत अर्धशतकी खेळी करून आफ्रिकेला 15 षटकात 95 धावांपर्यंत पोहचवले. 10 ते 15 मध्ये या दोघांनी 55 धावा चोपल्या. आता आफ्रिकेला शेवटच्या 5 षटकात 39 धावांची गरज होती.

टार्गेट आवाक्यात आले होते. माक्ररमने 39 चेंडूत अर्धशतकी खेळी केल्यानंतर हार्दिक पांड्याने त्याला 16 व्या षटकात 51 धावांवर बाद करत भारताला दिलासा दिला. मात्र माक्ररम अर्धवट सोडून गेलेलं काम डेव्हि मिलरने पूर्ण केले. त्याने 18 वे षटक टाकणाऱ्या अश्विनच्या षटकात सलग दोन षटाकर मारले. अश्विनने याच षटकात 6 चेंडूत 6 धावा करणाऱ्या स्टब्सला बाद करत विकेट घेतली.

आता सामना 12 चेंडूत 12 धावा असा आला होता. मोहम्मद शमीच्या 19 व्या षटकात आफ्रिकेने 6 धावा केल्या. शमीने पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर षटकातील तीन बॉल डॉट टाकले. शेवटच्या षटकात आफ्रिकेला विजयासाठी 6 धावांची गरज असताना भुवनेश्वर कुमारने पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर पार्नेलने एक धाव करून मिलरला स्ट्राईक दिले. विजयासाठी 4 चेंडूत 5 धावांची गरज असताना मिलरने चौकार मारत सामना 3 चेंडूत 1 धावा असा आणला. पुढच्याच चेंडूवर मिलरने चौकार मारत सामना स्टाईलमध्ये संपवला.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 20 षटकात 9 बाद 133 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एन्गिडीच्या भेदक माऱ्यासमोर भारताची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज देत 40 चेंडूत 68 धावांची खेळी करत भारताला शतकी मजल मारून दिली. रोहितने 15 तर विराटने 12 धावा केल्या. या तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने 4 तर वेन पार्नेलने 3 विकेट्स घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT