David Warner Retirement Esakal
क्रीडा

David Warner Retirement: कसोटीनंतर आता डेव्हिड वॉर्नरने वनडेतूनही घेतली निवृत्ती, जाणून घ्या शेवटचा सामना कधी खेळणार

David Warner Retirement: कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने सिडनी कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेत वनडेतूनही निवृत्ती जाहीर केली आहे. नववर्षानिमित्त त्याने त्याच्या चाहत्यांना ही निराशाजनक बातमी दिली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी डेव्हिड वॉर्नरने जागतिक क्रिकेट विश्वासह त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने अचानक एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर या दिग्गज क्रिकेटपटूने 2027 मध्ये पुन्हा भेटू, असे सांगितले होते. तो एकदिवसीय सामने खेळत राहील अशी अटकळ बांधली जात होती पण आता त्याने स्पष्ट केले आहे की, तो सिडनी कसोटीसह कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारातून निवृत्ती घेत आहे.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळलेली त्याची खेळी ही त्याची शेवटची वनडे खेळी असेल. वॉर्नरने पाकिस्तानसोबतची मालिका सुरू होण्यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. सध्या तो टी-२० आणि आयपीएल खेळत राहणार आहे.

सिडनी कसोटीपूर्वी जेव्हा डेव्हिड वॉर्नर पत्रकार परिषदेसाठी आला तेव्हा त्याने अचानक ही घोषणा केली. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज सिडनी कसोटीत अखेरच्या वेळी संघाच्या पांढऱ्या जर्सीत दिसणार आहे. संपूर्ण संघ त्याला विजयासह निरोप देऊ इच्छितो. एकदिवसीय क्रिकेटमधील भारताविरुद्धच्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये खेळल्या गेलेल्या खेळीमुळे त्याच्या चमकदार कारकिर्दीचा शेवट झाला.

टी-20 आणि आयपीएलमध्ये खेळणार

T20 च्या स्फोटक फलंदाजांपैकी एक डेव्हिड वॉर्नर हा देखील आयपीएलमधील महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखालीच सनरायझर्स हैदराबादने ट्रॉफी जिंकली. मात्र, खराब फॉर्मनंतर, फ्रँचायझीने त्याला मध्य हंगामाच्या कर्णधारपदावरून काढून टाकले आणि त्याचा प्रवास वादग्रस्त पद्धतीने संपला. आता तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा एक भाग आहे. टी-२० विश्वचषकानंतर तो क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो, असे मानले जात आहे.

डेव्हिड वॉर्नरचा एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड मजबूत

डेव्हिड वॉर्नरच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने 2009 मध्ये पदार्पण केले. आपल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियन सलामीवीराने एकूण 161 सामने खेळले, ज्यात त्याने 45.30 च्या सरासरीने 6932 धावा केल्या. त्याने 22 शतके आणि 33 अर्धशतके केली आणि सर्वोत्तम धावसंख्या 179 होती. याशिवाय वॉर्नरने क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये 733 चौकार आणि 130 षटकार मारले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT