David Warner Chopper Entry esakal
क्रीडा

David Warner Chopper Entry : वॉर्नर निवृत्त झाला तरी थाट काही कमी नाही झाला! चॉपर एन्ट्रीचा Video व्हायरल

David Warner Chopper Entry

अनिरुद्ध संकपाळ

David Warner Chopper Entry : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने नुकतेच कसोटी आणि वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तानविरूद्ध त्याने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळला. यावेळी अवघं स्टेडियम वॉर्नरच्या फेअरवेलसाठी मैदानावर अवतरलं होतं. आता याच सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर डेव्हिड वॉर्नरने ग्रँड एन्ट्री घेत सर्वांच लक्ष वेधलं.

आता डेव्हिड वॉर्नरने बिग बॅश लीगमध्ये धडाकेबाज एन्ट्री घेत आपल्याभोवतीचं वलय अजून कमी झालं नसल्याचं दाखवून दिलं. डेव्हिड वॉर्नरने सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर्स यांच्यातील सामन्यावेळी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हेलिकॉप्टरमधून मैदानावर एन्ट्री घेतली. डेव्हिड वॉर्नर हा आपल्या भावाच्या लग्नातून थेट सामना खेळण्यासाठी आला होता.

डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी सामन्यानंतर म्हणाला होता की, माझ्यासाठी एक-दोन हेलिकॉप्टर तयार आहेत. फक्त हवामानाने साथ दिली पाहिजे. लग्न आणि बीबीएलचं शेड्युल क्लॅश होत आहे. मात्र दोन्ही गोष्टींना उपस्थिती लावण्यासाठी मी प्रतिबद्ध आहे.'

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाबाबत बोलायचं झालं तर डेव्हिड वॉर्नरची जागा कॅमरून बेनक्रॉफ्ट घेण्याची शक्यता आहे. मात्र दुसऱ्या बाजूला स्टीव्ह स्मिथ देखील कसोटीत सलामीला खेळण्यासाठी उत्सुक आहे. त्याला वॉर्नरची जागा घ्यायची आहे. स्मिथ बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सरकडून खेळताना बेनक्रॉफ्ट सोबत सलामीला आला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

Latest Marathi News Live Update : शनिवार आणि रविवारी किल्ले सिंहगड राहणार बंद

Commonwealth Games 2026: सायकल दुरूस्तीचे काम करणाऱ्या बापाच्या लेकीने इतिहास घडवला... ज्युदोत पक्कं केलं पदक, कोण आहे अस्मिता डे?

SCROLL FOR NEXT