David Warner  
क्रीडा

David Warner : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर कसोटी क्रिकेटला करणार अलविदा ?

डेव्हिड वॉर्नर कसोटी क्रिकेटला करणार रामराम....

Kiran Mahanavar

David Warner on Retirement : टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद पटकावले. विश्वचषक संपताच क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. या स्पर्धेत फ्लॉप ठरलेला ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत देताना सांगितले की, कदाचित मी कसोटी क्रिकेटला अलविदा करेल कारण म्हणजे पुढील वर्षी होणारा एकदिवसीय विश्वचषक आणि त्यानंतर 2024 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधील हे माझे शेवटचे वर्ष असू शकते. पण मला पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट आवडते. वॉर्नर म्हणतो की, मला टी-20 क्रिकेट खेळायला आवडतो आणि मला 2024 च्या शेवटपर्यंत खेळायचे आहे. 2024 टी-20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियन संघाला 30 नोव्हेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. यानंतर कांगारू संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी आणि 3 एकदिवसीय मालिका खेळायची आहे.

टी-20 विश्वचषक 2022 च्या स्पर्धेत सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची बॅट पूर्णपणे शांत राहिली होती. या विश्वचषकात त्याने चार सामने खेळले ज्यात त्याला फक्त 44 धावा करता आल्या. वॉर्नरचा खराब फॉर्मही ऑस्ट्रेलियाला जड गेला आणि ऑस्ट्रेलियन संघ सुपर-12 मधूनच विश्वचषकातून बाहेर पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT