Deepak Chahar IND vs ZIM 
क्रीडा

IND vs ZIM : राहुलची मोठी खेळी; 7 महिन्यानंतर 'या' खतरनाक खेळाडूचे होणार पुनरागमन

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन वनडे मालिकेतील पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जात

Kiran Mahanavar

Deepak Chahar IND vs ZIM : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन वनडे मालिकेतील पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जात आहे. भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दीपक चहरचे भारतीय संघात तब्बल 7 महिन्याने पुनरागमन करत आहे. तर शिखर धवन आणि गिल सलामी देतील आणि कर्णधार केएल राहुल मधल्या फळीत खेळताना दिसेल.

दुखापतीमुळे 7 महिन्यांपासून टीम इंडियापासून दूर असलेला वेगवान गोलंदाज दीपक चहरने टीम इंडियात पुनरागमन केले आहे. त्याने फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्या सामन्यामध्ये त्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे तो श्रीलंका मालिका आणि आयपीएल 2022 मध्ये खेळू शकला नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे प्रशिक्षण घेतले होत. दीपक चहरने अलीकडेच त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत आग्रा येथे लग्न केले. फेब्रुवारीनंतर तो प्रथमच झिम्बाब्वे मालिकेतच खेळणार आहे.

संघ व्यवस्थापनाला या स्विंग गोलंदाजाची काळजी घ्यावी लागणार आहे. बराच काळ ब्रेक झाला असून तो देखील दुखावला गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे इतके सोपे नाही, जिथे तुम्हाला दुखापतीमुळे इतका मोठा ब्रेक मिळाला आहे. दीपकने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, दुखापतीमुळे दीर्घ विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे सोपे होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT