Deepak Chahar Jaya Marriage sakal
क्रीडा

हनीमूनला जा, पण या गोष्टीची काळजी घे...! बहीणीने दिला दीपकला सल्ला

लग्नानंतर दीपक आणि जया आता त्यांच्या हनीमूनच्या तयारीत

Kiran Mahanavar

Deepak Chahar Jaya Marriage: टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर दीपक चहरने अलीकडेच त्याच्या गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत विवाहबंधनात अडकला आहे. दीपक आणि जया गेल्या अनेक दिवसापासून हे एकमेकांना डेट करत होते. त्याने 1 जून रोजी सात फेरे घेतले. आग्रा येथे जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. क्रीडा जगतासह नातेवाईक आणि मित्रांनी दीपकला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. (Deepak Chahar Sister Malti Chahar Tweet Went Viral)

लग्नानंतर दीपक आणि जया आता त्यांच्या हनीमूनच्या तयारीत आहेत. दरम्यान, दीपकची बहीण मालती चहरनेही ट्विट करून भावाला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हनिमूनला जाण्यासाठी मोठा सल्ला दिला आहे. तिचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

दीपक चहरची बहीण मालती चहरही तिच्या सौंदर्यामुळे खुप चर्चेत असते. यावेळी तिच्या ट्विटमुळे जास्त चर्चेत आली आहे. मालतीने भाऊ दीपक आणि वहिनी जयासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिने भाऊ दीपकच्या हनीमूनबद्दल एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, आता मुलगी आमची आहे, दोघांनाही वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा. दीपक तुमच्या हनीमूनमध्ये तू तुझ्या पाठीची काळजी घे! कारण तुला वर्ल्ड कपही खेळायचा आहे.

आयपीएल हंगामामध्ये दीपक चहर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार होता. मेगा ऑक्शनमध्ये 14 कोटी रुपयांची बोली लावून दीपकला चेन्नईने विकत घेतले होते. पण त्याला पाठीला दुखापत झाली, ज्यामुळे तो हंगामात एकही सामना खेळू शकला नाही. टीम इंडियाला या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्ड कपही खेळायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT