Deepak Hooda sakal
क्रीडा

BCCI चे पैसे संपले! दीपक हुड्डाने प्रसिद्ध कृष्णाची जर्सी का घातली?

हुड्डाने कृष्णाची जर्सी घातल्याचे पाहून सोशल मीडियावर लोकांनी BCCI ला केले ट्रोल

Kiran Mahanavar

India Vs West Indies: भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान वेस्ट इंडिजचा 2 गडी राखून पराभव केला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा विंडीजवरचा हा सलग 12वा एकदिवसीय मालिका विजय आहे. भारताने हा विक्रम नोंदवताच पाकिस्तानचा विक्रमही उद्ध्वस्त केला. पाकिस्तान संघाने झिम्बाब्वेविरुद्ध सलग 11 एकदिवसीय मालिका जिंकली आहे. पण दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीपक हुड्डा वेगवान गोलंदाज कृष्णाच्या जर्सीत दिसला. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला लोकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली.

प्रसिद्ध कृष्णा या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. त्याच्या जागी आवेश खानला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. विंडीजला पहिला धक्का दीपक हुड्डाने दिला. त्याने काइल मेयर्सला त्याच्याच चेंडूवर बाद केले. या सामन्यात हुड्डाच्या या विकेटपेक्षा त्याच्या जर्सीचीच जास्त चर्चा झाली. सामन्याच्या सुरुवातीला हुड्डाच्या जर्सीच्या मागील बाजूस टेप होता. खेळ पुढे जात असताना हुडाच्या जर्सीतून टेप निघून गेला. त्यानंतर ही जर्सी त्या प्रसिद्ध कृष्णाची असल्याचे आढळून आले.

दीपक हुडाच्या जर्सीवर कृष्णाचे नाव पाहून चाहत्यांनीही सोशल मीडियावर मस्ती करायला सुरुवात केली. काही लोकांनी तर बीसीसीआयला विचारले की, वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्यांचे बजेट कमी आहे का? सोशल मीडियावर मीम्सचा गराडा पडला होता. एका यूजरने लिहिले की, दीपक हुड्डाने प्रसिद्ध कृष्णाची जर्सी का घातली आहे? बीसीसीआयचे बजेट कमी आहे का?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कॅरेबियन संघाने 50 षटकात 6 गडी गमावून 311 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 2 चेंडू बाकी असताना 8 गडी गमावून लक्ष्य गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT