Deepika Padukone FIFA World Cup Trophy Final esakal
क्रीडा

Deepika Padukone : FIFA World Cup Final मध्ये दीपिका रचणार इतिहास, हा मान मिळवणारी ठरणार पहिली भारतीय अभिनेत्री

अनिरुद्ध संकपाळ

Deepika Padukone FIFA World Cup Trophy Final : फिफा वर्ल्डकप इतिहासात कधी झालं नाही असं यंदा कतारमध्ये होणार आहे. यांदाच्या वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात FIFA World Cup trophy चे अनावरण करण्याचे भाग्य भारताची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा मान मिळवणारी दीपिका पदुकोण ही भारताची पहिली अभिनेत्री ठरणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिका पदुकोणनेच ती कतारला जात असल्याचे उघड केले आहे. जगातील सर्वात मोठा इव्हेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे फायनलमध्ये दीपिका पदुकोणच्या हस्ते अनावरण होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार संपूर्ण फुटबॉल जगत असणार आहे. दीपिका ही फिफाची ट्रॉफी फायनलमध्ये अनावरण करणारी पहिली भारतीय अभिनेत्री (कलाकार) ठरणार आहे.

दीपिकाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला होता. ती या फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी मेंबर म्हणून निवडली गेली होती. याचबरोबर गोल्डन रेशो ऑफ ब्युटी या संस्थेनुसार जगातील सर्वात सुंदर महिला टॉप 10 च्या यादीत समाविष्ट असणारी एकमेव महिला ठरली होती.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Full Schedule : भारत आता पुढच्या कसोटी मालिकेत तगड्या स्पर्धकाला भिडणार, जाणून घ्या २०२६ पर्यंतचं वेळापत्रक

Kannan Gopinathan : IAS पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेले कोण आहेत कन्नन गोपीनाथन? त्यांनी कलम 370 विरोधात उठवला होता आवाज

Political War : रणसंग्राम! मिनीविधानसभेचे आरक्षण ठरले, इच्छुकांच्या जोडण्या सुरू; अनेकांकडून स्टेट्स वॉर

Latest Marathi News Live Update : RSS कार्यकर्ते भारताचे काही विशेष नागरिक आहेत का?

IND vs WI 2nd Test Live: भारतीय संघाने जिंकली कसोटी मालिका! गौतम गंभीरला विजयाची भेट दिली, आता मिशन ऑस्ट्रेलिया...

SCROLL FOR NEXT