Delhi Capitals players welcome Ricky Ponting to team bus with saiyyan song  esakal
क्रीडा

बसमध्ये पाँटिंगची एंट्री होताच, दिल्लीच्या खेळाडूंनी गायले ‘सैयाँ’, VIDEO

क्रिकेट जगतात सध्या दिल्लीच्या विजयासह हेड कोच रिकी पाँटिंग यांची चर्चा सुरु झाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

धनश्री ओतारी

दोन दिवसांपूर्वी आयपीएल 15 व्या सीझनमधील 58 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना दिल्लीने 8 विकेट्सने जिंकला. मात्र, क्रिकेट जगतात सध्या दिल्लीच्या विजयासह हेड कोच रिकी पाँटिंग(Ricky Ponting) यांची चर्चा सुरु झाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

दिल्लीच्या संघाने सामन्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिल्लीचे खेळाडू आणि अन्य सदस्य बसमध्ये बसण्यासाठी जात आहेत.

त्यानंतर बसमध्ये खेळाडू बसल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) त्याची बॅग आणि हातात कॉफी घेऊन येतो. तो जसा बसमध्ये प्रवेश करतो, तसे खेळाडू एकत्र मिळून भारतीय गायक कैलाश खेर यांचे प्रसिद्ध गाणे ‘सैयाँ’ हे गाणे गातात आणि पाँटिंगचे स्वागत करतात.

बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने 20 षटकात 6 बाद 160 धावा केल्या. त्यानंतर दिल्लीने 18.1 षटकात 2 विकेट्स गमावत 161 धाव करून सामना जिंकला. दिल्लीकडून मिशेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 62 चेंडूत 89 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 7 षटकार मारले. तसेच डेव्हिड वॉर्नरने 41 चेंडूत नाबाद 52 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: बेटिंग ॲपला विरोध केल्याने कंटेंट क्रिएटरचे अपहरण, गळ्याला चाकू लावून बेदम मारहाण; चौघांना अटक

Mahavitaran Privatization: वीज वितरण पुन्हा खासगीकरणाच्या वाटेवर; ‘जीटीएल’च्या अपयशानंतरही फ्रँचायजीच्या हालचाली; संघटनांचा आंदोलनाचा इशारा

Pune Auto Fare Hike : पुणे अन् पिंपरी-चिंचवडकरांच्या खिशाला कात्री ! रिक्षाचा प्रवास महागणार; १ सप्टेंबरपासून नवीन दर लागू

Marathi Live Updates News: भाटघर धरण शंभर टक्के भरले, दरवाजे उघडताच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Maratha Students: सरकारच्या घोषणेला निधीचा ब्रेक! मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती निधीअभावी रखडल्या, सवलती कागदावरच

SCROLL FOR NEXT