Rishabh Pant IPL 2023  esakal
क्रीडा

Rishabh Pant IPL 2023 : पंत नसुनही असल्यासारखाच... दिल्लीच्या 'त्या' निर्णयाचे होतंय तोंडभरून कौतुक

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी देशाच्या राजधानीत दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे. येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग म्हणतात की, ऋषभ पंत माझ्यासोबत डगआऊटमध्ये बसेल.

जीवन मरणाची लढाई जिंकून पुन्हा आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करणारा ऋषभ पंत आयपीएलदरम्यान संघासोबत कसा प्रवास करेल, असा प्रश्न तेव्हा संपूर्ण मीडियाला पडला होता, पण लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धच्या मोसमातील पहिल्याच सामन्यात ऋषभ टीमसोबत नव्हता तरीही त्याचे अस्तित्व होतेच.

दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा नियमित कर्णधार ऋषभ पंतची जर्सी डगआउटच्या छतावर अडकवली आहे. आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्लीच्या या निर्णयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. फोटोमध्ये, दिल्ली फ्रँचायझीचे क्रिकेट संचालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली रिकी पाँटिंगसह ऋषभ पंतच्या जर्सीखाली डगआउटमध्ये स्पष्टपणे दिसू शकतात.

ऋषभ पंतने आधीच सांगितले आहे की तो फ्रँचायझीच्या घरच्या सामन्यांसाठी येण्याचा प्रयत्न करेल. मुंबईच्या कोकिला बेन हॉस्पिटलमध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून तो वेगाने बरा होत आहे हे सर्वांना माहीत आहे. वेळोवेळी तो सोशल मीडियावर बरा झाल्याचे फोटो पोस्ट करत असतो. सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, ऋषभच्या अनुपस्थितीत, या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व डेव्हिड वॉर्नर करत आहे.

दिल्लीने गेल्या मोसमात पाचवे स्थान पटकावले होते. दुसरीकडे, लखनौ सुपरजायंट्सने गेल्या मोसमात आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिली. केएल राहुल सलग दुसऱ्या सत्रात एलएसजीचे नेतृत्व करत आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

SCROLL FOR NEXT