Sushil Kumar google
क्रीडा

Wrestler Murder Case : सुशील कुमार विरोधात लूकआउट नोटिस

सुशांत जाधव

दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियमवर (Delhi Chhatrasal) दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेत एका पैलवानाचा मृत्यू झालाय. या प्रकरणात ऑलिम्पिक विजेत्या सुशील कुमारचे नाव समोर आले असून या घटनेपासून तो फरार आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आता त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस (Lookout Notice ) जारी केली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी प्रसारमाध्यमांना यासंदर्भातील माहिती दिली. पोलिसांनी पीडितांची जबानी नोंदवून घेतली असून मॉडेल टाउन परिसरातील फ्लॅट खाल करण्यावरुन दोन गटात वाद झाल्याची माहिती समोर आलीये.

याप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये सुशील कुमारचे (Sushil Kumar) नाव आहे. तो फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या परिसरात पोलिसांनी छापामारी करत त्याचा शोध घेत असल्याची माहितीही पोलिसांनी यापूर्वी दिली होती. ज्यावेळी भांडण झाले त्यावेळी सुशील कुमार त्याठिकाणी होता, असा आरोप पीडितांनी केलाय. याप्रकरणात सुशील कुमारसह अजय, प्रिंस दलाल, सोनू, सागर, अमित आणि अन्य काहींची नावे आहेत. यातील एकाला अटक झाली आहे.

लूकआउट नोटिस म्हणजे नेमकं काय?

एखादा आरोपी देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी लूकआउट सर्क्युलर (LOC) किवा लूकआउट नोटीस जारी केले जाते. पसार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी याचा वापर केला जातो. आंतरराष्ट्रीय सीमेवर (आंतरराष्ट्रीय विमानतळ, समुद्री क्षेत्र, बंदरे) संबंधित आरोपीची चौकशी करण्यासाठी याचा वापर केला जातो.

Delhi Police Issue Lookout Notice Against Wrestler Sushil Kumar In Chhatrasal wrestler murder case

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT