Dhanashree Verma  sakal
क्रीडा

Dhanashree Verma : युझवेंद्रची पत्नी धनश्री रूग्णालयात दाखल! चाहत्यांसाठी दिला खास संदेश

धनश्री वर्माला हॉस्पिटलच्या बेडवर पाहून चाहते झाले आश्चर्यचकित

Kiran Mahanavar

Dhanashree Verma : भारताचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने शुक्रवारी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेली दिसत आहे. धनश्री वर्माला हॉस्पिटलच्या बेडवर पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहे.

धनश्री वर्माच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली असून डान्स करताना धनश्री पडली होती. तिच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे धनश्रीवर शस्त्रक्रिया करावी लागली. ती लवकरच परतणार असल्याचे तिने इंस्टाग्रामवर सांगितले आहे.

इंस्टाग्राम वर पोस्ट करत करताना धनश्रीने लिहिले की, यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. आयुष्यातील प्रत्येक धक्का हा चांगल्या पुनरागमनाचा सेटअप असतो. पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने परत येईल… कारण देवाने तुमच्या परतीसाठी हे नियोजन केले आहे. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार. त्याच्यावर कोणत्या प्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे हे अद्याप कळले नसले तरी चाहते त्याला पुन्हा पुन्हा विचारत आहेत की काय झाले आहे?

धनश्रीच्या या पोस्टवर पती युजवेंद्र चहल आणि भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने कमेंट केली. चहलने लिहिले, पत्नी लवकर बरी हो. याशिवाय त्याने कमेंटमध्ये हार्ट इमोजीही आहे. त्याचवेळी, सूर्यकुमार यादव यांनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. आशिया कपसाठी चहल टीम इंडियासोबत दुबईत आहे. धनश्रीने आपल्यावर कुठे शस्त्रक्रिया केली हे सांगितले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT