Dilip Vengsarkar Shikhar Dhawan Captaincy  ESAKAL
क्रीडा

Shikhar Dhawan : तुम्ही शिखर धवनला कर्णधार करता... वेंगसरकरांनी BCCI, निवडसमितीवरच काढला जाळ

अनिरुद्ध संकपाळ

Dilip Vengsarkar Shikhar Dhawan Captaincy : भारतीय संघाचा WTC Final मध्ये पराभव झाल्यानंतर संघ, खेळाडू, कोच यांच्यावर तर टीका झालीच मात्र आता माजी खेळाडूंच्या रडारवर बीसीसीआय आणि निवडसमिती देखील आली आहे. गेल्या काही वर्षापासून निवडसमिती सदस्यांच्या निर्णयावरून त्यांची विचारसरणी भविष्याचा वेध घेणारी नसल्याचे दिसून आले आहे अशी टीका दिलीप वेंगसरकर यांनी केली आहे.

हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत भारताचे माजी कर्णधार आणि निवडसमिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर म्हणाले की, 'गेल्या सहा - सात वर्षापासून निवडसमितीमध्ये कोणतीही दूरदृष्टी, क्रिकेटचं सखोल ज्ञान आणि क्रिकेटिंग सेन्स दिसलेला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांनी ज्यावेळी एकाचवेळी दोन मालिका असतात, मुख्य खेळाडू उपलब्ध नसतात त्यावेळी त्यांनी शिखर धवनला भारतीय संघाचा कर्णधार केलं. याऐवजी तुम्ही भविष्यातील कर्णधार तयार करू शकला असता.'

वेंगसरकर यांनी संधी असूनही भारतीय संघाने भविष्यातील कर्णधार तयार केला नाही याबाबत निराशा व्यक्त केसी. याचबरोबर त्यांनी बीसीसीआयवर देखील टीका केली. त्यांनी फक्त आयपीएल असणं पुरेसं नाही असं म्हणत बीसीसीआयला इशारा दिला.

वेंगसरकर म्हणाले, 'तुम्ही कर्णधार म्हणून कोणालाही तयार केलं नाही. तुम्ही जशा मालिका येत गेल्या तशा तुम्ही त्या खेळत गेलात. तुम्ही सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून बाता मारता, कुठं आहे तुमची बेंच स्ट्रेंथ? आयपीएल असणे, प्रसारण हक्कातून कोट्यावधी रूपये कमवणे फक्त हेच ध्येय असू शकत नाही.'

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आता आपल्या कारकिर्दीच्या उतरंडीला लागला आहे. मात्र बीसीसीआय आणि निवडसमिती यांच्यात त्याचा कर्णधार म्हणून उत्तराधिकारी कोण याबाबत कोणतीही स्पष्टता नाहीये.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT