Team India Dinesh Karthik sakal
क्रीडा

World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये होणार दिनेश कार्तिकची एन्ट्री! दिले मोठे संकेत

Kiran Mahanavar

World Cup 2023 Dinesh Karthik : भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आपल्या वक्तव्याने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कार्तिक म्हणाला की, आगामी विश्वचषकात तू मला नक्कीच पाहशील.

या वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारताला यजमानपद मिळणार आहे. विश्वचषक 2023 चा सलामीचा सामना 5 ऑक्टोबर रोजी आणि अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. आगामी विश्वचषकात तो कॉमेंट्री करताना दिसणार असल्याचे संकेत दिनेश कार्तिकने दिले आहेत.

38 वर्षीय दिनेश कार्तिकने एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. एका चाहत्यांने दिनेश कार्तिकला टॅग केले आणि विचारले की विश्वचषकासाठी तुमच्या नजरेत विकेटकीपरसाठी दोन पर्याय कोण आहेत. तुम्हाला केएल राहुल, इशान किशन आणि संजू सॅमसन पैकी दोघांची निवड करावी लागेल.

2019 एकदिवसीय विश्वचषक आणि 2022 टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळलेल्या दिनेश कार्तिकने उत्तर दिले, "मी एवढेच सांगू शकतो की तुम्ही मला विश्वचषकात नक्कीच पहाल."

दिनेश कार्तिक त्याच्या कॉमेंट्रीमुळे खूप चर्चेत आहे. त्याने दोनदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कॉमेंट्री केली. विश्वचषकात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा दिनेश कार्तिक कॉमेंट्री करताना दिसणार आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेडमध्ये कॉमेंट्री करत आहे.

मात्र, विश्वचषकाचा विचार केला तर भारताची पहिली पसंती इशान किशन राहते. नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत डावखुऱ्या फलंदाजाने सलग तीन अर्धशतके झळकावली. सॅमसननेही दोन सामन्यांत अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर केएल राहुल आशिया चषकापूर्वी सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Mira Bhayandar Morcha : 'परप्रांतीयांनी मोर्चा काढला, त्यांचा हेतू वाईट नव्हता, पण मनसेचा..'; आमदार मेहतांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता!

Latest Maharashtra News Updates : "लाज असल्यास मंत्रीपदाचा राजीनामा द्या" - राजन विचारे

Pimple Gurav News : निम्मे सीसीटीव्ही कॅमेरे ‘दृष्टीहीन’ देखभालीचा अभाव; सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरमधील सुरक्षा ऐरणीवर

Yash Dayal: यश दयालच्या विरोधात FIR दाखल, होऊ शकते १० वर्षांची शिक्षा! तक्रार करणाऱ्या महिलेने पुरावेही केले सादर

Kolhapur Accident : साहिलवर होती कुटुंबाची जबाबदारी, कुरिअर सेवेनंतर विकायचा बिर्याणी; पार्सल देऊन लवकर येतो म्हणून गेला अन्...

SCROLL FOR NEXT