R Ashwin 
क्रीडा

मुंबईचा माजी क्रिकेटर म्हणतो,"मी अश्विनला सर्वोत्तम मानतच नाही"

नामदेव कुंभार

मुंबई - रविचंद्रन अश्विनची सार्वकालिक सर्वोत्तम गोलंदाजांत गणना कशी होते, हेच मला कळत नाही. क्रिकेट जगतातील आघाडीच्या देशांत तो प्रभावी नाही, अशी टिप्पणी संजय मांजरेकर यांनी केली. मांजरेकर यांनी काही वर्षांपूर्वी रवींद्र जडेजास लक्ष्य केले होते. आता त्यांना अश्विनला सार्वकालिक सर्वोत्तम म्हणणे पसंत नाही. अश्विनने ७८ कसोटींत ४०९ फलंदाज बाद केले आहेत. त्यापैकी २८६ भारतातील आहेत. त्याने ३० पैकी २६ वेळा निम्मा संघ भारतात बाद केला आहे.

अश्विनची गणना काही जण सार्वकालीक सर्वोत्तम गोलंदाजात करतात. ते मला मान्य नाही. अश्विन दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशात प्रभावी नाही. तिथे त्या देशात त्याने एकाही डावात निम्मा संघ बाद केलेला नाही, असे मांजरेकर यांनी सांगितले. अष्टपैलू रवींद्र जडेजाने चार वर्षात अश्विनच्या तोडीस तोड कामगिरी केली आहे, एवढेच नव्हे तर अक्षर पटेल जास्त भरवशाचा गोलंदाज होत आहे, याकडे मांजरेकर यांनी लक्ष वेधले.

अश्विन एकहाती संघ बाद करतो, असे म्हंटले जाते. भारतीय खेळपट्ट्या त्याच्या गोलंदाजीस पोषक आहेत. पण याच तोडीची कामगिरी जडेजाची आहे. इंग्लंडविरुद्ध अश्विनपेक्षा अक्षर पटेल जास्त यशस्वी होता, असे मांजरेकर यांनी सांगितले. पटेलने इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटीत २७ फलंदाज बाद केले, तर अश्विनने चार कसोटींत ३२ जणांना टिपले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

IPL 2026: ऋतुराज गायकवाडला संजू सॅमसनमुळे CSK संघात जाणवतोय धोका? माजी कर्णधाराचा खळबजनक दावा

Gemma 4 : इंटरनेटची गरज संपली! गुगलने लॉन्च केले Gemma 4; आता डेटा संपला तरी मोबाईल चालेल सुपरफास्ट, कसं वापरायचं पाहा

Gold Rate: सोनं 30 हजारांनी स्वस्त! चांदीही 1.6 लाखांनी घसरली; आता भाव वाढणार की अजून पडणार?

Parbhani News: ही तर दिवसाढवळ्या परभणीकरांची लूटच!; टॅंकर माफियांकडून नागरिक वेठीस; हजार लिटरसाठी घेताहेत ५०० रुपये

SCROLL FOR NEXT