Rahul Dravid File Photo
क्रीडा

'संघ कसा चालवायचा हे राहुल द्रविडला शिकवू नका'

"राहुल द्रविड तुमच्यासोबत जोडला गेलाय, तर प्लीज त्याच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवा"

दीनानाथ परब

नवी दिल्ली: "राहुल द्रविडला (Rahul dravid) त्याच्या दूरदृष्टीने काम करु द्या तसेच भविष्याची संघ बांधणी करण्यासाठी त्याला पूर्ण स्वातंत्र्य द्या" अशी विनंती माजी क्रिकेटपटू अजय जाडेजा (Ajay jadeja) यांनी बीसीसीआयला केली (Bcci) आहे. बीसीसीआयने बुधवारी राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. राहुल रवी शास्त्रींची (Ravi shastri) जागा घेणार आहे. टी२० वर्ल्डकप नंतर मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहण्याची इच्छा नसल्याचे रवी शास्त्री यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु होता.

राहुल द्रविडच्या निवडीचे अनेकांनी स्वागत केले आहे. "शिस्तीच्या बाबतीत राहुल द्रविड आदर्श आहे. त्याच्या कामाच्या पद्धतीतून भारतीय क्रिकेटपटूंना शिकता येईल, त्यांना फायदा होईल" असे जाडेजाने म्हटले आहे.

"शिस्त आणि समर्पण यामध्ये कोणी आदर्श असेल, तर तो राहुल द्रविड आहे. तुम्हाला कोचकडून अनेक गोष्टी हव्या असतात. पण शिस्त आणि समर्पण या दोन मुख्य गोष्टी आहेत. राहुल द्रविड की, निवडकर्ते, पुढचा टी २० कॅप्टन कोण ठरवणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे" जाडेजा क्रिकबझशी बोलत होता. संघ कसा चालवायचा हे राहुल द्रविडला सांगू नका, अशी जाडेजाने बीसीसीआयला विनंती केली.

"जर तुम्ही राहुल द्रविडला आणलय. ते एक मोठं नाव आहे, कमीत कमी त्याच्या दूरदृष्टीने वाटचाल करा. ही माझी बोर्डाला विनंती आहे. राहुल द्रविड तुमच्यासोबत जोडला गेलाय, प्लीज प्लीज त्याच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवा. संघ कसा चालवायचा हे राहुल द्रविडला शिकवू नका" असे जाडेजा म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup सामन्यात फुल राडा! विदर्भाचा गोलंदाज अन् दिल्लीकर फलंदाज एकमेकांच्या अंगावर गेले धावून, पाहा Viral Video

Latest Marathi News Live Update : गडचिरोली जिल्ह्यातल्या दोन तालुक्यात पाऊस

Shahu Maharaj: 'हे' दोन मराठा तरुण होते म्हणून औरंगजेब बालछत्रपतींचे धर्मांतर करु शकला नाही, जाणून घ्या त्यागाचा इतिहास

Avoid Junk Food: आकर्षक पॅकेजिंग, चमचमीत चवीला म्हणा 'नो'! घरीच बनवलेल्या पौष्टिक पर्यायांनी जपा आरोग्य

Jaggery Health Benefits: दररोज सुपारीएवढा गूळ देतो ताकद, शुद्धी आणि आरोग्याचे चांगले फायदे

SCROLL FOR NEXT