Duleep Trophy sakal
क्रीडा

Duleep Trophy : सरफराज खान शुन्यावर बाद, पुजारा-सुर्याही फ्लॉप

दुलीप करंडक : शॉ, पुजारा, सूर्यकुमार, सर्फराझ अपयशी

सकाळ वृत्तसेवा

अलूर : पृथ्वी शॉ (२६ धावा), चेतेश्‍वर पुजारा (२८ धावा), सूर्यकुमार यादव (७ धावा) आणि सर्फराझ खान (०) या स्टार व दिग्गज क्रिकेटपटूंना दुलीप करंडकातील उपांत्य लढतीतील पहिल्या डावात अपयशाला सामोरे जावे लागले.

नावाजलेल्या फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका पश्‍चिम विभागाला बसला. तरीही अतित सेठच्या ७४ धावांच्या खेळीच्या जोरावर पश्‍चिम विभागाने पहिल्या दिवशी ८ बाद २१६ धावा फटकावल्या. मध्य विभागाकडून वेगवान गोलंदाज शिवम मावी याने ४३ धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

पश्‍चिम विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. येथे सकाळी ढगाळ वातावरण होते, पण पृथ्वी शॉ, चेतेश्‍वर पुजारा, सूर्यकुमार यादव व सर्फराझ खान या स्टार फलंदाजांच्या समावेशामुळे पश्‍चिम विभागाने ढगाळ वातावरणाला न घाबरता फलंदाजीसाठी पुढाकार घेतला, पण या निर्णयाचा त्यांना फायदा झाला नाही.

कर्णधार प्रियांक पांचाल व पृथ्वी शॉ या सलामी जोडीने आश्‍वासक सुरुवात केली. यश ठाकूरच्या गोलंदाजीवर पृथ्वी याला १६ धावांवर जीवदान मिळाले. पण त्याला याचा फायदा घेता आला नाही. उपांत्यपूर्व फेरीत आठ विकेट घेणाऱ्या सौरभ कुमारच्या गोलंदाजीवर पृथ्वी ध्रुव जोरेलकरवी झेलबाद झाला.

त्याला २६ धावाच करता आल्या.भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत असलेल्या सूर्यकुमार यादवलाही मोठी खेळी करता आली नाही. शिवम मावीच्या गोलंदाजीवर विवेक सिंग याने या लढतीतील दुसरा झेल सोडला. त्यावेळी सूर्यकुमार ७ धावांवर होता. पृथ्वीप्रमाणे त्यालाही या संधीचा फायदा घेता आला नाही.

शिवम मावीच्याच गोलंदाजीवर सूर्यकुमार जुरेलकरवी झेलबाद झाला. त्याला सातच धावा करता आल्या. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर सर्फराझ खान खेळपट्टीवर आला, पण १२ चेंडूंचा सामना केल्यानंतर तो पुन्हा पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला धावांचे खातेही उघडता आले नाही.

पुजाराचा संथ खेळ

एकीकडे पृथ्वी शॉ, प्रियांक पांचाल, सूर्यकुमार यादव व सर्फराझ खान हे स्टार खेळाडू अपयशी ठरत असतानाच कसोटीपटू चेतेश्‍वर पुजारा याने खेळपट्टीवर नांगी टाकली. त्याने १०२ चेंडूंमध्ये तीन चौकारांसह अवघ्या २८ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक ः पश्‍चिम विभाग ९० षटकांत ८ बाद २१६ धावा (पृथ्वी शॉ २६, प्रियांक पांचाल १३, चेतेश्‍वर पुजारा २८, अतित सेठ ७४, धमेंद्र जडेजा ३९, शिवम मावी ४/४३) वि. मध्य विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT