Durand Cup 2023 East Bengal  esakal
क्रीडा

Durand Cup 2023 East Bengal : अखेर इस्ट बंगालने 1658 दिवसांचा दुष्काळ संपवला; कट्टर प्रतिस्पर्धी मोहन बागानला चारली पराभवाची धूळ

अनिरुद्ध संकपाळ

Durand Cup 2023 East Bengal : इस्ट बंगाल फुटबॉल क्लबच्या चाहत्यांना आज त्यांच्या लाडक्या क्लबने जल्लोष करण्याची संधी दिली. विशेष म्हणजे इस्ट बंगाल फुटबॉल क्लबच्या चाहत्यांना हा खास जल्लोष तब्बल 1658 दिवसांनी करण्याची संधी मिळाली आहे.

इस्ट बंगालने तब्बल 1658 दिवसांनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मोहन बागान फुटबॉल क्लबला पराभूत केले. ही कामगिरी त्यांनी डुरांड कप फुटबॉल स्पर्धेत केली. इस्ट बंगालकडून नंदकुमार शेखरने एकमेव गोल केला. याचबरोबर कोलकाता डर्बीमधील इस्ट बंगालचा विजयाचा दुष्काळ संपला.

सामन्याच्या 60 व्या मिनिटाला नंदकुमारने मोहन बागानवर गोल केला. याचबरोबर मोहन बागानसाठी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न देखील लांबणीवर पडले. जर इस्ट बंगालने पंजाब एफसी सोबतचा आपला लीग स्टेजमधील शेवटचा सामना जिंकला तर मोहन बागानचे क्वार्टर फायलनमध्ये पोहचण्याचे स्वप्न धुळीस मिळणार आहे.

मोहन बागानचे ग्रुप स्टेजमधील सर्व सामने खेळून झाले आहे. ग्रुप अ मध्ये त्यांनी तीन सामन्यात 6 गुण मिळवले आहेत. तर इस्ट बंगालने दोन सामन्यात 4 गुण मिळवले आहेत. सहा ग्रुपमधील टॉपर संघ आणि दोन बेस्ट रनर अप संघ अंतिम 8 संघात प्रवेश करणार आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT