durand cup  
क्रीडा

Durand Cup : इतिहास कोलकात्याकडे वर्तमान गोव्याचा

सपुर्ण स्पर्धेत बहारदार खेळ करणाऱ्या गोवा एफसीने सलग पाच सामने अपराजित राहत अंतिम फेरीत मुंसडी मारली आहे.

दीपक कुपन्नावर

अशियातील सर्वात जुनी आणि जगातील तिसऱ्या क्रमाकांची डयुरँड कप स्पर्धेचा अंतिम सामना कोलकत्याचा मोहामेडन आणि गोवा एफसी यातुल्यबळ संघात रंगणार आहे. स्पर्धेच्या गौरवशाली 130 वर्षाच्या वाटचालीत कोलकत्याच्या संघानी सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावून हुकुमुत राखल्याने इतिहास मोहामेडनच्या बाजूने आहे. तर अलिकडे इंडियन फुटबॉल लिगसह (आयएसएल) एएफसी कप चॅम्पियनशिप स्पर्धेत ठसा उमटविणाऱ्या प्रशिक्षक हुआन फरेन्डों यांच्या गोवा एफसीकडे वर्तमानाचा कौल आहे.

सपुर्ण स्पर्धेत बहारदार खेळ करणाऱ्या गोवा एफसीने सलग पाच सामने अपराजित राहत अंतिम फेरीत मुंसडी मारली आहे. खासकरुन गोव्याचे युवा प्रतिभावान खेळाडू देवेंन्द् मुरगांवकर आणि नेमिल यांचा चौफेर खेळासमोर मोहामेडनचा परदेशी खेळाडू मार्कुस जोसेफची डाळ शिजणार का हे पाहणे औत्सुकाचे ठरेल.

गोवा एफसीने यंदाच्या हंगामाची पुर्वतयारी म्हणूनच या स्पर्धेत जाणीवपुर्वक सहभाग घेतल्याचे प्रशिक्षक फरेन्डों यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यतः युवा खेळाडूंना अधिक खेळण्याची संधी देत संघाची बांधणीला प्राधान्य दिले. कौतुकाची बाब म्हणजे संधी मिळालेल्या गोमंतकीय देवेंन्द आणि रिलायन्स चॅम्पसचा प्रोडक्ट केरळीयन नेमीलने स्पर्धेत प्रत्येकी पाच गोल करीत संघव्यवस्थापणाचा विश्वास सार्थकी लावला आहे. आक्रमक फुटबॉल खेळत गटात सुदेवा दिल्ली, जमशेदपुर आणि आर्मी ग्रीनला सहज धुळ चारीत नऊ गोल लगावत गोवा उपात्यंपुर्व फेरीत पोहचला.

दिल्ली एफसीचा ५ गोलने धुव्वा उडवत उपात्यंफेरीत प्रवेश मिळविला. बंगळूरु एफसीने उपात्यंफेरीत गोवा एफसीला निर्धारीत वेळेत २-२ असे रोखीत घाम फोडला. टायब्रेकरमध्ये गोवा एफसी सुदैवी ठरला. चेंडूवर सातत्याने निंयत्रण आणि आक्रमक खेळावर भर हाच गोव्याचे सुत्र राहिले आहे. डावपेचात माहिर असणारे प्रशिक्षक फरेन्डों आपल्या भारतातील कारकीर्दीत प्रतिष्ठेचा डयुरँड कपवर नांव कोरण्यासाठी सर्वस्वपणाला लावतील यात शंका नाही. तुलनेत गतवर्षी आय़ लिग प्रथम श्रेणीत बढती मिळालेला मोहामडेन घरच्या मैदानावर खेळत डयुरँड कप विजेतेपदाची हॅटट्रीक पुर्ण करण्यासाठी मैदानात उतरेल. रशियन प्रशिक्षक अँन्डु चेरमाशेव्ह यांच्या मार्गदर्शनाखील खेळणाऱ्या मोहामेडन गटात दोन विजयाच्या मदतीने बंगळूरू युनायटेडकडून निसटता पराभव स्विकारत बाद फेरीत पोहचला. उपात्यंपुर्व फेरीत गतविजेता गोकुलुमला एका गोलने नमवित मोहामेडने आगेकूच केली.

आय लिग प्रथम श्रेणीसाठी दंड थोपटलेल्या बंगळूरु एफसीने स्पर्धेत लक्षवेधी खेळ केला. उपात्य़ं सामन्यात मोहामेडनने साखळीतील पराभवाचे उट्टे काढत बंगलूरु युनायटेला ४-२ असे आव्हान मोडून काढले. पाच गोल नोंदविणारा स्टायकर मार्कुस जोसेफवर संघाची भिस्त आहे. दोन्हीं संघाच्या गोलरक्षकांनी चिवट खेळ करत प्रतिस्पर्ध्याला फारशी संधी दिलेली नाही. त्यामुळेच हा सामना अधिक रंगण्याची चिन्हे आहेत. एकुणच इतिहास जिंकणार की वर्तमान याकडेच तमाम भारतीय फुटबॉलचे लक्ष वेधुन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT