Sai Sudharsan Wicket No ball Controversy 
क्रीडा

Asia Cup 2023 : पाकिस्तानची चिटिंग अन् अंपायरची बेईमानी? भारताला फायनलमध्ये मोठा फटका

सकाळ ऑनलाईन टीम

Asia Cup 2023 Ind vs Pak Final : इमर्जिंग आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये भारताला पाकिस्तानकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या युवा संघाने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली, परंतु पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या हाय-व्होल्टेज फायनलमध्ये त्यांना विजयाची लाइन क्रॉस  करता आली नाही.

पण, साई सुदर्शनच्या विकेटवरून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तो ज्या चेंडूवर आऊट झाला तो नो बॉल होता, असे मानले जात आहे. मात्र तिसऱ्या पंचाला नो बॉल दिला नाही आणि सलामीवीराला 29 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

भारतासोबत धोका झाली का?

पाकिस्तानसोबत खेळल्या गेलेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडिया 353 धावांच्या डोंगरासारख्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली तेव्हा भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर चांगली फलंदाजी करणारा सलामीवीर साई सुदर्शन 28 चेंडूत 29 धावा करून बाद झाला.

खरं तर, भारतीय डावाच्या 9व्या षटकात अर्शद इक्बालच्या शॉर्ट पिच बॉलवर सुदर्शनने मोठा शॉर्ट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू मोहम्मद हरिसच्या हातात गेला. पण सुदर्शनच्या विकेटवर गोंधळ सुरू आहे.

मैदानावरील पंचांनी फ्रंट फूट नो बॉल तपासला. टीव्हीचे रिप्ले बघून अर्शदचा पाय रेषेच्या पुढे आहे असे दिसत होते. मात्र, तिसऱ्या पंचाला तसे वाटले नाही आणि त्यांनी नो बॉल दिला नाही. त्यामुळे सुदर्शन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

या स्पर्धेत फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याने साई सुदर्शनची विकेट भारतासाठी महत्त्वाची होती. पाकिस्तानसोबत खेळल्या गेलेल्या साखळी सामन्यात त्याने शतक झळकावले. सुदर्शनने अंतिम फेरीतही चांगली सुरुवात केली होती आणि 28 चेंडूत 29 धावा केल्यानंतर तो खेळत होता. जर अंपायरने अर्शदच्या चेंडूला नो बॉल दिला असता, तर कदाचित सुदर्शन काहीतरी अप्रतिम करू शकला असता आणि मोठी खेळी खेळून भारताला विजयाच्या दिशेने नेऊ शकला असता.

भारताने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जिथे प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला 353 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यामध्ये टीम इंडिया 224 धावांवर गारद झाली आणि सामना 128 धावांनी गमावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 : पाकिस्तानी वंशांच्या क्रिकेटपटूला T20 World Cup साठी भारताने व्हिसा नाकारला; सोशल मीडियावर लिहितो की...

Belly Fat Reduction: पोटाची चरबी कमी करायची आहे? हार्वर्ड डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएटचं बेस्ट फॉर्मुला

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर: दहशतवादी संबंधांच्या आरोपाखाली 5 सरकारी कर्मचारी निलंबित

Pandharpur Politics : 'आमदार आवताडेंनी पंढरपुरात भाजपचे सहा उमेदवार पाडले'; पराभूत महिला उमेदवाराच्या पतीचा गंभीर आरोप, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Shiv Thakare: अखेर त्या अफवा खोट्या ठरल्या; शिव ठाकरेने सांगितलं 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

SCROLL FOR NEXT