ENG vs AUS Ashes 5th Test Stuart Broad  
क्रीडा

ENG vs AUS Ashes 5th Test: रोमहर्षक कसोटी सामन्यात इंग्लंडचा नाट्यमय विजय! ब्रॉडने शेवट केला गोड

सकाळ ऑनलाईन टीम

ENG vs AUS Ashes 5th Test Stuart Broad : प्रत्येक सामना उत्कंठावर्धक ठरलेल्या अॅशेस या प्रतिष्ठेच्या कसोटी मालिकेचा शेवटही रोमहर्षक झाला. यजमान इंग्लंडने अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियावर ४९ धावांनी विजय मिळवत अॅशेस मालिका २-२ बरोबरीत राखली.

मात्र मागील मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकल्यामुळे करंडक मात्र त्यांच्याकडेच कायम राहिला. अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉड याने अॅलेक्स कॅरी व टॉड मर्फी यांना महत्त्वाच्या क्षणी बाद करून इंग्लंडला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तसेच आपल्या कारकीर्दीची सांगताही यशस्वी केली.

ऑस्ट्रेलियाने बिनबाद १३५ या धावसंख्येवरून सोमवारी पुढे खेळायला सुरुवात केली. ख्रिस वोक्सने डेव्हिड वॉर्नर (६० धावा) व उस्मान ख्वाजा (७२ धावा) यांना झटपट बाद करीत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. त्यानंतर मार्क वूड याने मार्नस लाबुशेनलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ३ बाद १६९ या धावसंख्येवरून स्टीव्हन स्मिथ व ट्रॅव्हीस हेड यांनी डाव सावरला. दोघांनी ९५ धावांची भागीदारीही रचली.

पावसाच्या ब्रेकनंतर डाव गडगडला

स्टीव्हन स्मिथ व ट्रॅव्हीस हेड ही जोडी खेळत असताना पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने तेव्हा ३ बाद २५६ धावा केल्या होत्या. याचा अर्थ संघ विजयपथावर रूढ होता, पण काही काळानंतर खेळ पुन्हा सुरू करण्यात आला आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव गडगडला.

ऑस्ट्रेलियाला ३३४ धावांपर्यंतच मजल मारता आली. फलंदाजी करताना अखेरच्या चेंडूवर षटकार मारणाऱ्या ब्रॉड याने कारकीर्दीतील अखेरच्या चेंडूवर अॅलेक्स कॅरीला बाद केले. ऑस्ट्रेलियन संघ ३८४ धावांचा पाठलाग करीत होता. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने चार, तर मोईन अलीने तीन फलंदाज बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT