क्रीडा

ENG vs IND 1st Test: कसोटी क्रिकेटबद्दल कोहलीचं मोठं वक्तव्य

सुशांत जाधव

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. सध्याच्या खेळाडूंमध्ये कसोटी क्रिकेटबद्दल अधिक उत्साह नाही, असे तो म्हणाला. कोहली स्काय स्पोर्ट्स या इंग्लिश चॅनेलवरील कार्यक्रमात बोलत होता. भारतीय संघ 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या माध्यमातून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात करणार आहे.

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने खास मुलाखतीमध्ये कसोटी क्रिकेटवर भाष्य केले. तीन वर्षांपूर्वीच कसोटी क्रिकेट धोक्यात अडकले असते. पण खेळाडूंनी अजूनही टेस्ट क्रिकेटला जिंवत ठेवलंय. जर आम्ही कसोटी क्रिकेट खेळण्याची मानसिकता ठेवली नसती तर याचा मोठा फटका कसोटी क्रिकेटला बसला असता. जागतिक क्रिकेटवर याचे परिणाम उमटले असते, असे मत विराट कोहलीने व्यक्त केले.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा ही कसोटीसाठी नवसंजीवनी असल्याचेही म्हटले आहे. तो म्हणाला की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या संकल्पनेमुळे प्रत्येक कसोटी सामान्यात रंगत निर्माण झालीये. खेळाडू कसोटीमध्ये कसा खेळ करतात यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत. मी एकही चेंडू सोडू नये, असे टेलिव्हिजनवर क्रिकेट पाहणाऱ्या चाहत्यांना वाटत असेल तर ही गोष्टच कसोटीला जिंवत ठेवते, असे विराट कोहलीने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

Latest Marathi News Live Update: कर्नाटक कॉंग्रेसचे आमदार खर्गेंच्या भेटीला

Pune Crime: गुन्हे शाखेकडून वाघोलीतील हातभट्टी जेसीबीने उद्ध्वस्त; दोन लाखाचा मुद्देमाल नष्ट, गुन्हे शाखेचा छापा!

SCROLL FOR NEXT