rishabh pant first odi century
rishabh pant first odi century सकाळ
क्रीडा

Eng vs Ind : पंतच्या पहिल्या शतकाच्या जोरावर भारताचा मालिका विजय

Kiran Mahanavar

Rishabh Pant First ODI Century : ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून भारताला विजय मिळवून दिला आहे. भारताने 38 धावांवर 3 विकेट गमावल्या असताना त्याने शतक झळकावले. ऋषभ पंतचे वनडे कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. पंतने 106 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. ऋषभ पंत शतक करूनच थांबला नाही, तर संघाला विजय मिळवून देऊनच पॅव्हेलियनमध्ये परतला. पंत 113 चेंडूत 125 धावा करून नाबाद राहिला.(rishabh pant first odi century against england)

ऋषभ पंतच्या या खेळीमुळे भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला. भारताने हा सामना 45 चेंडू शिल्लक असताना जिंकला. या विजयासह भारतीय संघाने 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना मँचेस्टर येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे दाखवत इंग्लंडचा डाव 259 धावांत गुंडाळला. यानंतर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. ऋषभ पंत फलंदाजीला आला तेव्हा 38 धावांवर 3 गडी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. पंतने आणि हार्दिक पांड्यानी पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी करत इंग्लंडला बॅकफूटवर आणले. भारताची धावसंख्या 205 धावा असताना पांड्या बाद झाला. पांड्या बाद झाल्यानंतर पंतने रवींद्र जडेजाच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. पंतने आपल्या शतकात 16 चौकार आणि 2 षटकार मारले. रवींद्र जडेजा 7 धावांवर नाबाद राहिला.

ऋषभ पंत 2018 पासून एकदिवसीय सामने खेळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने 26 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 85 होती. कसोटी सामन्यांचा विचार केला तर या फॉरमॅटमध्ये त्याने 5 शतके झळकावली आहेत. त्याची कसोटी कारकीर्द 31 सामन्यांची आहे, ज्यामध्ये त्याने 43.32 च्या सरासरीने 2123 धावा केल्या आहेत. पंतने 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 22.58 च्या सरासरीने 768 धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 65* धावा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT