Joe Root Century Sourav Ganguly 
क्रीडा

सौरव गांगुलीने थोपटली जो रूट ची पाठ, म्हणाला...

जो रूटच्या 26व्या कसोटी शतकाच्या जोरावर इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला.

Kiran Mahanavar

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्स वर पहिला कसोटी सामना खेळला गेला. न्यूझीलंडविरुद्ध रूटने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. जो रूटच्या 26व्या कसोटी शतकाच्या जोरावर इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात रुटने 115 धावांची नाबाद खेळी खेळताना शतक पूर्ण केले आणि १०,००० धावाही पूर्ण केल्या. जो रूटने हे विशेष स्थान प्राप्त करताच, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने त्याचे ट्विट करत कौतुक केले. त्याला सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक म्हटले आहे.(Joe Root Century Sourav Ganguly)

इंग्लंडसाठी १०,००० कसोटी धावा करणारा रुट हा अॅलिस्टर कुकनंतर दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर हे स्थान मिळवणारा तो जगातील 14वा खेळाडू आहे. याशिवाय आता लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर रुटच्या आणखी एक शतकाचा समावेश झाला आहे.

सामन्यातबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु संघ 132 धावांत आटोपला होता. इंग्लंडचा संघही पहिल्या डावात केवळ 141 धावाच करू शकला. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 277 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर २७७ धावांचे लक्ष्य होते. एका क्षणी यजमान 20 षटकांत 4 गडी गमावून 69 धावांवर संकटात सापडले होते. मात्र, रुट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी पाचव्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. स्टोक्सने 54 धावांवर काईल जेमिसनकडून त्याची विकेट गमावली. त्यानंतर यष्टिरक्षक फलंदाज बेन फॉक्स फलंदाजीसाठी मैदानात आला. रूटसोबत 6व्या विकेटसाठी नाबाद 120 धावाची भागीदारी केली, आणि इंग्लंडला 5 विकेटने विजय मिळवून दिला. इंग्लंडचा आणि न्यूझीलंडमध्ये नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज येथे १० जूनला मालिकेतील दुसरा सामना खेळला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT