23rd Over Tribute Shane Warne 
क्रीडा

ENG vs NZ : मॅच सुरु असताना २३ व्या ओव्हरलाअचानक थांबला खेळ, कारण भावनिक...

23 व्या षटकांनंतर 23 सेकंदांसाठी सामना थांबवण्यात आला होता

Kiran Mahanavar

23rd Over Tribute Shane Warne: इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यामध्ये लॉर्ड्सवर पहिला कसोटी सामना खेळल्या जात आहे. सामना सुरु असताना 23 व्या षटकांनंतर 23 सेकंदांसाठी थांबवण्यात आला होता. इंग्लंड क्रिकेटनेही त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. खेळ थांबवण्याचे कारण दुसरे तिसरे कोणी नसून महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे केलं होत.

दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे नुकतेच थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लॉर्ड्स क्रिकेट मैदान त्याच्यांसाठी एक ऐतिहासिक होते. शेन वॉर्नने लॉर्ड्स मैदान अनेक विक्रमी केली आहे. त्याचा जर्सी क्रमांक 23 होता, त्यामुळे 23 व्या षटकांनंतर 23 सेकंदांसाठी सामना थांबवण्यात आला होता. शेन वॉर्नची काही संस्मरणीय फोटो मोठ्या पडद्यावर लोकांना दाखवण्यात आली.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. 30 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या 8 गडी बाद 86 अशी होती. इंग्लंडकडून अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने 38 धावांत 4 बळी घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT