क्रीडा

World Cup 2019 : स्टोक्सची धमाल अन् इंग्लंड सुपर ओव्हरमध्ये विश्वविजेता

सुनंदन लेले

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : चाळीस पेक्षा जास्त वर्ष आणि 11 विश्वचषकांच्या उपवासानंतर इंग्लंड संघाला विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकारता आले. लॉर्डस् मैदानावर झालेल्या चित्तथरारक अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमधे इंग्लंड संघाने कणखरता दाखवत न्युझिलंड संघाला पराभूत करून विजेतेपदावर हक्क सांगितला. गोलंदाजांनी न्युझिलंडचा डाव 8 बाद 241 धावांवर रोखून आपली कामगिरी पार पाडल्यावर इंग्लिश फलंदाजांनी गडबड केली होती. संघाला गरज असताना बटलर - स्टोकस् जोडीने जबरदस्त शतकी भागीदारी करून विजयाच्या जवळ नेले. प्रचंड दडपणाखाली बेन स्टोकस्ने नाबाद 84 धावा करून सामना सुपर ओव्हरमधे नेला. सुपर ओव्हरमधे स्टोकस् बटलरने  संघ विश्वविजेता झाला. 15 धावा काढल्या. पाठलाग करताना जोफ्रा आर्चरच्या अचूक गोलंदाजीसमोर न्युझिलंडला 15च काढता आल्या आणि इंग्लंड. 


लंडनच्या ढगाळ हवामानाने 15 मिनिटे खेळ उशिराने चालू झाला. गडद वातावरण असून न्युझिलंडचा कप्तान केन विल्यमसनने फलंदाजी करायचा निर्णय घेतला तेव्हा आश्चर्य व्यक्त केले गेले. मार्टीन गुप्टीलने पहिल्यापासून फक्त फटकेबाजीचा विचार केला होता. 19 धावा करताना त्याने षटकारही ठोकला. फक्त त्याचे धाडस जास्त काळ टिकले नाही. ख्रिस वोकस्ने त्याला पायचित केले. दुसर्‍या विकेटकरता विल्यमसन - निकोल्स जोडीने समंजस फलंदाजी केली. टप्पा पडल्यावर चेंडू पटकन बॅटवर येत नसल्याने मोठे फटके मारणे शक्य होत नव्हते. दोनही फलंदाजांनी त्याचा विचार करून सावध पवित्रा घेतला. 

30 धावांवर जम बसलेल्या विल्यमसनला प्लंकेटने झेल बाद केले आणि पाठोपाठ निकोल्स अर्धशतक करून बाद झाला. तीच एकमेव भागीदारी झाली न्युझिलंडच्या डावामधे. बाकीचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिले. इंग्लंडच्या सर्व प्रमुख गोलंदाजांनी खूपच प्रभावी मारा करून फलंदाजांना सतत चाचपडत ठेवले. मधल्या फळीत टॉम लॅथमने 47 धावा करून धावसंख्येला आकार द्यायचा प्रयत्न केला जो अपुरा ठरला. वोकस् आणि प्लंकेटने प्रत्येकी 3 फलंदाजांना बाद केल्याने न्युझिलंडचा डाव 8बाद 241 वर रोखला गेला. 

इंग्लिश फलंदाजांचा सध्याचा फॉर्म बघता पाठलाग करायची धावसंख्या आवाक्याबाहेरची नक्कीच वाटत नव्हती. खेळ चालू झाल्यावर जेसन रॉय पहिल्याच चेंडूवर पायचित होताना वाचला. आक्रमक खेळ पसंत करणार्‍या जेसन रॉयने धोका पत्करून कडक ड्राईव्हज् मारले. झपाट्याने धावा जमा करणारा रॉय धमाका करणार वाटत असताना मॅट हेन्रीने त्याला बाद केले. 

ज्यो रुटला कॉलीन डी ग्रंडोमने हळुवार आउट स्वींग टाकून चकवले आणि झेल द्यायला भाग पाडले. नंतर जेव्हा जरा नजर बसलेला बेअरस्टोला लॉकी फर्ग्युसनने बाद केले तेव्हा दडपण वाढू लागले. क्रिकेटच्या खेळात समोर दिसणारी धावसंख्या अचानक मोठी वाटू लागते जेव्हा प्रमुख फलंदाज बाद व्हायला लागतात. थोड्या थांबून येणार्‍या खेळपट्टीवर फटके मारणे किती कठीण आहे हे कप्तान मॉर्गनला लगेच समजले. निशमने आपटलेल्या चेंडूवर स्क्वेअरकटचा फटका मारताना उडालेला झेल फर्ग्युसनने पुढे पळत येत पाण्यात मारावा तसा सूर मारत पकडला.

प्रेक्षकांना सामना भलतेच रंग दाखवू लागला असल्याचे समजले. मग इंग्लिश चाहत्यांनी जोरजोरात गाणी म्हणत फलंदाजांचे आणि मोजक्या किवी चाहत्यांनी गोलंदाजांचे मनोधैर्य वाढवणे चालू केले. डाव सावरणार्‍या बटलर - स्टोकस्ने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केल्यावर कोणा फलंदाजाने शतक पूर्ण केल्यावर पडतात तशा टाळ्या वाजवल्या गेल्या. दरम्यान सलग 10 षटके मारा करून फक्त 25 धावा कॉलीन डी ग्रंडोमने दिल्याने अपेक्षित धावगती हळूच 6.5च्या टप्प्यावर गेली.

अंतिम सामन्याच्या अंतिम टप्प्यात 10 षटकात 72 धावा जमा करायचे आव्हान उरले होते म्हणजेच दोनही संघांना समान संधी होती. जोस बटलर आणि बेन स्टोकस्ने अफलातून फलंदाजी करताना संघाचा गेलेला तोल सावरला. शतकी भागीदारी करून मोठा फटका मारताना बटलर बाद झाला आणि अजून एक वळण सामन्याला मिळाले. 

आता खेळ दडपण पेलण्याचा होता आणि सगळ्यांची नजर स्टोकस्वर होती. 49व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्टोकस्चा झेल बोल्टने घेतला पण अजाणतेपणी त्याचा पाय सीमारेषेला लागला आणि तो षटकार ठरला. शेवटच्या षटकातील पहिले दोन चेंडू धावेशिवाय गेल्यावर नाट्य घडले. तिसर्‍या चेंडूवर स्टोकस्ने षटकार मारला आणि चौथ्या चेंडूवर दोन धावा पडून काढल्यावर धावबाद करायला फेकलेला चेंडू स्टोकस्च्या बॅटला लागून चौकार गेला ज्यला ओव्हर थ्रो म्हणतात म्हणजेच परत सहा धावा जमा झाल्या. चौथ्या चेंडूवर रशीद धावबाद झाला आणि एकच धावा जमा झाली. विजयाकरता दोन धावा विजयाला हव्या असताना शेवटचा फलंदाजही धावबाद झाला आणि सामना सुपर ओव्हरमधे गेला. 

सुपर ओव्हर चालू झाल्यावर स्टोकस् बटलर मैदानात आले आणि त्यांनी 15 धावा बोल्टच्या षटकात चोपल्या. नीशम - गुप्टील जोडी मैदानात आली. जोफ्रा आर्चरचा पहिला चेंडू वाईड गेला. दुसर्‍या चेंडूवर निशमने दोन धावा काढून तिसरा चेंडू प्रेक्षकात भिरकावला. अजून तीन धावा पळून काढल्यावर शेवटच्या चेंडूवर दोन धावा करायची जबाबदारी गुप्टीलवर आली. शेवटच्या चेंडूवर गुप्टील दुसरी धाव काढताना धावबाद झाला आणि केवळ जास्त चौकार मारले म्हणून  इंग्लंडला विजयी करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT