Ben Stokes Frustrated As Shoaib Bashir marathi news sakal
क्रीडा

Ind vs Eng : मालिकेपूर्वी संघाला मोठा धक्का! खेळाडूला मिळाला नाही भारताचा व्हिसा; कर्णधार संतापला

Ind Vs Eng Test Series 2024 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका उद्यापासून सुरू होणार आहे.

Kiran Mahanavar

India vs England Test Series News :

हैदराबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका उद्यापासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 25 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मालिकेबाबत चाहत्यांमध्ये तसेच खेळाडूंमध्ये उत्साह आणि जोश आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहेत, मात्र मालिका सुरू होण्यापूर्वीच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भारताच्या व्हिसाच्या प्रतीक्षेत असलेला इंग्लंडचा युवा खेळाडू शोएब बशीरने पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. शोएब बशीर अनेक दिवसांपासून यूएईमध्ये भारताच्या व्हिसाची वाट पाहत होता, मात्र भारताने या खेळाडूला व्हिसा दिलेला नाही. खेळाडूची फाईल पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे त्याला व्हिसा दिला जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, शोएब बशीर मूळचा पाकिस्तानी आहे, त्यामुळेच भारताने या खेळाडूला व्हिसा दिला नाही, असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.

शोएब बशीरच्या संघातून बाहेर पडण्यावर इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने आक्षेप घेतला आहे. कर्णधार म्हणाला की, आम्हाला भारताकडून अपेक्षा आहे की आमच्या खेळाडूंना व्हिसा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. व्हिसा न मिळाल्याने शोएब बशीर निराश झाला आणि त्याने स्वतःला संघातून केले आहे. बशीर व्यतिरिक्त मी स्वतः देखील यामुळे निराश झालो आहे. कर्णधार पुढे म्हणाला की, आम्ही डिसेंबर महिन्यातच आमच्या संघाची घोषणा केली होती, पण आजपर्यंत शोएबला व्हिसा मिळालेला नाही.

स्टोक्स म्हणाला की, शोएब हा पहिला खेळाडू नाही ज्याला व्हिसा न मिळाल्याने समस्यांना सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा यालाही अशाच अडचणींचा सामना करावा लागला होता. भविष्यात आम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, मात्र शोएबसाठी हा अनुभव खूपच वाईट असेल. तो युवा खेळाडू आहे, पण त्याला आधीच अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT