World Record Sakal
क्रीडा

इंग्लंडचा विश्वविक्रम! एकदिवसीय सामन्यात ठोकल्या 498 धावा

नेदरलँडविरोधात तब्बल ४९८ धावा केरत विक्रम केला आहे.

दत्ता लवांडे

इंग्लंडच्या संघाने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वांत मोठा जागतिक रेकॉर्ड तयार केला आहे. नेदरलँडविरोधात तब्बल 498 धावा करत एकदिवसीय सामन्यातील सर्वांत जास्त धावांचा विक्रम तोडला आहे. यामध्ये तीन खेळाडूंनी शतक ठोकले असून 4 गड्यांच्या बदल्यात संघाने तब्बल 498 धावा केल्या आहेत.

(England World Record In ODI Cricket)

अॅमस्टेलवीन येथील व्हीआरए स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध हा सामना खेळला गेला आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने 498 धावा काढल्या आहेत. यादरम्यान संघाचे 4 गडी बाद झाले असून तिघांनी शतके केले आहेत. दरम्यान इंग्लंडने नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे जून 2018 मध्ये केलेला त्यांचाच रेकॉर्ड मोडला आहे. त्यांनी जून 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 481 धावा केल्या होत्या.

दरम्यान इग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना हा धावांचा डोंगर उभा केला आहे. नेदरलँडच्या वेगवान गोलंदाज शेन स्नॅटरने दुसऱ्याच षटकात सलामीवीर जेसन रॉयला बाद केल्यामुळे संघाला सर्वोत्तम सुरुवात करता आली नाही. त्यानंतर फिल सॉल्ट आणि डेविड मलान यांनी डाव सावरला. या दोघांनीही शतके झळकावली आहेत.

दरम्यान त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या बटलरने अवघ्या 70 चेंडूंत सात चौकार आणि 14 षटकारांच्या मदतीने नाबाद 162 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनंतर 150 धावा करणारा तो दुसरा वेगवान खेळाडू बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT